Join us  

संकटाच्या काळात विविध संघटना  गरजूंच्या मदतीसाठी सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 7:40 PM

संकटाच्या काळात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईमध्ये काही सामाजिक संस्था सरसावल्या आहेत.

मुंबई : देशावर कोरोनासारखे भीषण संकट ओढवल्याने हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. या संकटाच्या काळात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईमध्ये काही सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. 

मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये सामाजिक संस्थांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. चेंबूरमध्ये गरजूंसाठी अन्नधान्य वाटप करण्यात आले. जितेन्द्र म्हात्रे यांच्या संघटनेतर्फे हे अन्नधान्य वाटप करण्यात आले. तर शिवडी पूर्व विभागातील इंदिरा नगर,रेती बंदर,मुंबई ऑईल मिल या ठिकाणी हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांना आणि त्यांच्या मुलांना मोफत  जेवण  आणि फळांचे वाटप करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक २०६ च्यावतीने शिवडी पूर्व विभागात हे वाटप करण्यात आले. आम्ही गिरगावकर टीमने मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजार रूपयांची मदत केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार  "आम्ही गिरगांवकर" या टीमने  मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजाराचा धनादेश सुपूर्द केला. तसेच आम्ही महाराष्ट्रातील  सर्व मंडळांना आवाहन सुद्धा करीत आहोत की साधारण १ लाख मंडळ, संस्था आहेत  त्यांनी देखील किमान रू दहा हजाराचा जरी  निधी दिला तरी शेकडो करोड निधी उभा राहील अशी माहिती आम्ही गिरगावकर टीमचे गौरव सागवेकर यांनी भायखळ्यात भाजपच्यावतीने गरजूंना अन्नदान करण्यात आले. भायखळा येथे  भाजपचित्र मुंबई उपाध्यक्ष रोहिदास लोखंडे यांच्यावतीने सातरस्ता, भायखळा विभागातील गोरगरीब जनतेला सोशल डिस्टन्स ठेऊन अन्नदान करण्यात आले.

टॅग्स :अन्नकोरोना सकारात्मक बातम्या