लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत ड्रग्जची विक्री करणाऱ्या दुकलीला एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मोहम्मद शाहिद मोहम्मद सईद कुरेशी (३६) आणि आसपाक अहमद शाहिद अहमद कुरेशी (३५), अशी अटक दुकलीची नावे आहेत.
ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाराम पाटील मार्ग याठिकाणी रात्रीच्या वेळी अमली पदार्थांची विक्री चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाअंती दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २ लाख चाळीस रुपये किमतीचे ४० ग्रॅम एमडी सापडले. त्यांची दुचाकी तसेच ड्रग्ज विक्रीतून मिळवलेली ४ लाखांची रोकड, असा एकूण ६ लाख ६० हजार रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली. त्यांच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
........................