Join us

मेट्रोमुळे अंधेरीच्या राजाला होणार मोठी गर्दी....वेस्टर्न

By admin | Updated: August 25, 2014 22:33 IST

मेट्रोमुळे अंधेरीच्या राजाला होणार मोठी गर्दी

मेट्रोमुळे अंधेरीच्या राजाला होणार मोठी गर्दी

अंधेरी: अंधेरीच्या राजा गणपतीला यंदा अंधेरी-वसार्ेवा मेट्रो रेल्वेमुळे मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. गेल्यावर्षी सुमारे १० लाख गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले होते. यंदा बंगळुरुमधील टिपू सुलतानचा देखावा साकारण्यात येत आहे. अंधेरीच्या राजाची ओळख म्हणून मेट्रोच्या येथील रेल्वे स्थानकाला आझादनगर मेट्रो स्थानक असे नाव देण्यात आल्याचे माहिती समितीचे प्रवक्ते उदय सालियन यांनी सांगितले.
मुंबईतल्या जवळजवळ सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र अंधेरीच्या राजा याला अपवाद असून अनंत चतुर्दशीनंतर येणार्‍या संकष्टीला अंधेरीच्या राजाचे विसर्जन होते, हे अंधेरीच्या राजाचे वेगळेपण आहे.
मेट्रोमुळे साकीनाका, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण,कर्जत या परिसरातील गणेशभक्तांना अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. मेट्रोच्या आझादनगर रेल्वे स्थानकापासून अंधेरीचा राजा हा केवळ ३-४ मिनिटांच्या अंतरावर आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनाने गणेशभक्तांच्या सोयीसाठी आणि अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी मध्यरात्री नंतरही वसार्ेवा-घाटकोपर-वसार्ेवा अशी मेट्रो रेल्वे सेवा सुरु ठेवावी, अशी मागणी समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस आणि सचिव विजय सावंत यांनी केली आहे