Join us  

नागुबाई निवासच्या रहिवाश्यांच्या अडचणीत वाढ दलालांनी साधली संधी रातोरात घरांचे भाडे डिपॉझिट दुपटीने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 2:49 PM

अवघ्या पाच दिवसांपूर्वी याच परिसरातील भाड्याच्या घरांसाठी ५ ते ५.५ हजार मासिक भाडे, सुमारे २५-३० हजार रुपये डिपॉझिट घेण्यात येत होते. पण त्यात आता तीन हजारांनी भाड्यात तर डिपॉझिटमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदलालांनी साधली संधी ?रातोरात घरांचे भाडे डिपॉझिट दुपटीने वाढले!

डोंबिवली: पश्चिमेकडील नागुबाई निवास इमारत शुक्रवारी रात्री अचानक खचली, त्यातील रहिवाश्यांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने घराबाहेर धाव घेतली. अनेक कुटूंबिय काही क्षणात बेघर झाली, नेमका याच संधीचा फायदा घेत परिसरातील दलालांनी लुटालूट सुरु केली. अवघ्या पाच दिवसांपूर्वी याच परिसरातील भाड्याच्या घरांसाठी ५ ते ५.५ हजार मासिक भाडे, सुमारे २५-३० हजार रुपये डिपॉझिट घेण्यात येत होते. पण त्यात आता तीन हजारांनी भाड्यात तर डिपॉझिटमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मासिक भाडे ७.५ ते ८ हजार तर डिपॉझिट थेट ५०-६० हजार करण्यात आले आहे. या संधीसाधूपणामुळे रहिवाश्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.रातोरात हजारो रुपये कसे वाढले? कशासाठी आणि का? अशा सवालांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे दलालांलांकडून होणारी लुट थांबवा असे साकडे रहिवाश्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले. एकीकडे आमचे छत्र हरवले असतांना आता ही लुट कशी थांबवायची. एवढे पैसे आणायचे तरी कुठून? घरातले सामानही अडकले आहे, ते पूर्ण मिळेल याचीही शाश्वती नाही. आणि मिळाले तरी ते लगेच ठेवण्यासाठी घर तर हवेच. त्यामुळे सामान धोकादायक इमारतीत आणि रहिवासी रस्त्यावर अशा विचित्र अवस्थेत नागरिक आहेत. बँकेची कागदपत्रे या गोंधळात नेमकी कुठे ठेवली, ती कधी मिळणार, व्यवहार करण्यासाठी बँकेत कधी जायचे? अशा विचित्र कचाट्यात नागरिक सापडले आहेत. ज्येष्ठ नागरिकांची परवड सुरु असून आराधना इमारतीच्या तळ मजल्यावर गाद्या टाकुन रात्र काढण्यात येत आहे. पण सामान काढल्यानंतर परवडणारे घर नाही, ते हलवण्यासाठी टेम्पोला द्यायला पैसे नाहीत. एवढी वर्षे इथेच राहिल्याने आता अन्यत्र जाण्यापेक्षा परिसरातच राहण्याचा प्रयत्न रहिवासी करत आहेत, पण अव्वच्या सव्वा रेट वाढल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.संजय पवार या रहिवाश्याने ती खदखद पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली. दलालांच्या सुळसुळाटापासून आम्हाला वाचवा असे त्याने सांगितले. पेपर विक्रेत्या, तर कोणी रिक्षाचालक, काही घराकाम करतात अशा प्रतिकुल परिस्थितीत रोजचा दिवस कसा काढायचा हा प्रश्न सतावत असतो. या ठिकाणच्या ७२ पैकी ५० रहिवाश्यांची हालाखिची स्थिती असल्याचे ते म्हणाले. एका घरात तर केवळ दोघी महिला राहतात. त्यातील राशन सावला हिचे पुढील महिन्यात लग्न होणार आहे. त्यामुळे आई एकटी राहणार असून याची चिंता त्या कुटूंबियांसमोर आहे. गर्दीतच इस्टेट एजंट येतात. घर पाहिजे का असे विचारतात. त्यात एक मराठी आणि दोन गुजराती भाषिक दलालांचा समावेश असल्याचे पवार,विनोद जाधव, राकेश महाजन आदींसह अनेकांना अनुभव आल्याचे संजयने सांगितले.----------

टॅग्स :ठाणेडोंबिवली