व्हॉट्सॲपच्या युजर्सचा अन्य ॲपकडे ओढा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:10 AM2021-01-12T06:10:16+5:302021-01-12T06:10:38+5:30

आपण यापूर्वीच बरीच माहिती व्हॉट्सॲपकडे दिली आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार आणखी काही नवे त्यांच्याकडे जाणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Drag WhatsApp users to other apps | व्हॉट्सॲपच्या युजर्सचा अन्य ॲपकडे ओढा

व्हॉट्सॲपच्या युजर्सचा अन्य ॲपकडे ओढा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्हॉट्सॲपच्या नव्या धोरणामुळे वापरकर्ते हवालदिल झाले आहेत. नव्या धोरणामुळे खासगी आयुष्य धोक्यात येईल, असा आरोप केला जात आहे. नोटिफिकेशन न स्वीकारल्यास ८ फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲप बंद होईल, असे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे वापरकर्ते दुसऱ्या ॲपकडे वळत असल्याचे चित्र आहे..

आपण यापूर्वीच बरीच माहिती व्हॉट्सॲपकडे दिली आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार आणखी काही नवे त्यांच्याकडे जाणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. व्हॉट्सॲपकडून येत असलेले नोटिफिकेशन स्वीकारले गेले तर आपल्या व्हॉट्सॲपचा डेटा फेसबुकला शेअर होईल. यासंदर्भात या क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ पीयूष सोमाणी यांनी सांगितले की, मुळात व्हॉट्सॲप धोरणाबाबत जे काही सांगितले जात आहे त्यात काही नवे नाही. कारण आपण कित्येक वर्षे व्हॉट्सॲप वापरत आहोत. आपल्याला माहितीही नसेल एवढी आपली माहिती वापरली गेली असेल. आपल्या बहुतांश परवानग्या आपण त्यांना देऊन बसलो आहोत. नवे धोरण आल्यानंतर आता आपण जो विचार करत आहोत तो विचार आपण पूर्वी करणे गरजेचे होते, असेही सोमाणी यांनी सांगितले.

डाटा जाणार नाही 
n टेलिग्राम किंवा सिग्नल हा पर्याय असला तरी सगळे तिकडे शिफ्ट होणार आहे का? शिवाय कोणी काय वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. n व्यापारी वर्गाला ही भीती असावी म्हणून विरोध केला जात आहे. आपली पर्सनल माहिती तिकडे जाणार आहे डाटा नाही हे लक्षात घेतले पाहिजे, असेही सोमाणी यांनी सांगितले.

Web Title: Drag WhatsApp users to other apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.