Join us  

अशी सभा नको रे बाबा... व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 1:37 AM

नगरसेवक हवालदिल : व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक नकोच

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन सुरू झाल्याने अनेकांवर घरातूनच काम करण्याची वेळ आली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या कामकाजातून मुंबई महापालिकेचीही सुटका होऊ शकली नाही. मात्र आॅनलाइन पद्धतीने होणारी महासभा म्हणजे डोकेदुखीचे कारण ठरत आहे. विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर आॅनलाइन गोंधळ वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्व खबरदारी पाळत प्रत्यक्ष बैठका घेण्याची मागणी नगरसेवकांकडून जोर धरत आहे.

मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्व समित्यांच्या बैठका व महासभा रद्द करण्यात आल्या. मात्र गेले पाच महिने पालिकेचे कामकाज खोळंबले असल्याने जुलै महिन्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानुसार पालिकेची पहिली महासभा पार पडली. या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणी, नेटवर्क प्रॉब्लेम, नगरसेवकांच्या कार्यालय व घरातील संभाषण असा सर्व गोंधळ सुरू राहिला.सोमवारी पार पडलेल्या दुसºया महासभेत विविध समित्यांवरील नवीन सदस्यांची नावे गोंधळातच जाहीर करण्यात आली. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून होणाºया विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका कशा घ्यायच्या, असा प्रश्न आता पडला आहे. या आॅनलाइन महासभेबाबत नगरसेवकांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी यापुढे प्रत्यक्ष बैठक घेण्यासाठी राज्य सरकारशी सल्लामसलत करण्याची विनंती आयुक्तइक्बाल सिंह चहल यांना केली आहे.गेल्या दोन महासभांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या. आवाज स्पष्ट येत नाही, लॉगिन होत नाही, अशा तक्रारी नगरसेवकांकडून येत होत्या. त्यामुळे किमान समित्यांच्या निवडणुका प्रत्यक्ष घेण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे.- किशोरी पेडणेकर, महापौरमहापालिकेत २२७ नगरसेवक आहेत. पण त्या सर्वांना तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाइन हजर राहता येत नाही. नगरसेवकांना आपले मत मांडता येत नसेल तर अशा सभांचा काय उपयोग? समिती निवडणुकांमध्ये मतदान करणाºया सदस्यांची सही कशी घेणार?- रवी राजा, विरोधी पक्षनेते

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका