Join us  

कुत्र्याने गृहपाठ खाल्ला, वाऱ्यामुळे उडाली वही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 6:07 AM

ब-याचदा गृहपाठ अर्धवट राहिल्यामुळे मुले शाळेत जाणे टाळतात आणि त्यासाठी कृत्र्याने गृहपाठ खाल्ला, वा-याने वही उडाली अशी मजेशीर उत्तरे देत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

- सीमा महांगडे मुंबई : गृहपाठ करायचा अनेक मुलांना कंटाळा येतो. ब-याचदा गृहपाठ अर्धवट राहिल्यामुळे मुले शाळेत जाणे टाळतात आणि त्यासाठी कृत्र्याने गृहपाठ खाल्ला, वा-याने वही उडाली अशी मजेशीर उत्तरे देत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.ब्रेनली या आॅनलाइन पीयर-टू-पीयर लर्निंग कम्युनिटीने देशभरातील १४ ते १७ वर्षे वयोगटातील खासगी तसेच सरकारी शाळेतील २,२०९ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात विद्यार्थी आणि पालकांना गृहपाठाशी संबंधित एकूण ९ प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील गृहपाठ का केला नाही म्हणून आतापर्यंत दिलेले सर्वांत मजेशीर कारण कोणते, असा प्रश्न पालकांना / शिक्षकांना विचारल्यावर ४३.३ टक्के मुलांनी गृहपाठ करायला विसरलो, असे उत्तर दिल्याचे समोर आले. १३.१ टक्के मुलांनी बॅगेतून कोणीतरी वही चोरली, ८.२ टक्के मुलांनी वहीवर चहा/कॉफी सांडली, ६.१ टक्के मुलांनी अभ्यास करताना उपयोगी संगणक बिघडला अशी कारणे दिली.सर्वांत मजेशीर कारण म्हणजे ५.३ टक्के विद्यार्थ्यांनी कुत्र्याने वही खाल्ली, ४.० टक्के विद्यार्थ्यांनी वाºयामुळे गृहपाठाची वही हातातून उडाली, ३.४ टक्के विद्यार्थ्यांनी गृहपाठाची वही आगीत जळून गेली, तर ४.१ टक्के विद्यार्थ्यांनी लहान मुलाने किंवा भावाने वही फाडली किंवा भांडणाच्या रागातून खाऊन टाकली अशी कारणे दिली आहेत.>...तर गृहपाठ करणे होईल आवडीचेअनेकदा गृहपाठ करताना येणाºया अडचणी सोडवता न येणे हेच गृहपाठ न करण्यामागचे आणि त्यासाठी विविध कारणे देण्यामागचे कारण असते. पालक, शिक्षकांमध्ये आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांकडून गृहपाठ खेळकर वातावरणात आणि आकर्षक संकल्पना ठेवून करून घेतला तर त्यांना गृहपाठ करणे आवडू लागेल आणि हळूहळू नियमित गृहपाठ करण्याची त्यांना सवय लागेल. विद्यार्थ्यांनी आॅनलाइन स्रोतांची मदत घेतल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठ करणे सोपे होईल आणि त्यांच्यासाठी माहितीच्या स्रोतांची अनेक दालने उघडू शकतात.- मिशल बोर्कोस्की, सहसंस्थापक आणि सीईओ, ब्रेनली विद्यार्थ्यांना कारणे देण्याची आवश्यकता निर्माण होते तेव्हा ते सामान्यत: गृहपाठाची वही हरवली (१८.७ टक्के), वैयक्तिक इजा झाली (१४.६ टक्के), डोकेदुखी (१४.१ टक्के), कौटुंबिक परिस्थिती (९.८ टक्के) अशी कारणे देत असल्याचे समोर आले आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाटते की जर त्यांना पुरेशी आॅनलाइन मदत मिळाली तर ते त्यांचा गृहपाठ वेळेत पूर्ण करतील. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्यासाठी इंटरनेटला महत्त्व देण्याची गरज असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.>५० टक्के विद्यार्थी करतात वेळेवर गृहपाठ पूर्णअनेक विद्यार्थी गृहपाठ करायचे टाळत असले तरी ५० टक्के विद्यार्थी वेळेवर गृहपाठ पूर्ण करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. जवळपास ३० टक्के विद्यार्थ्यांनी ते वारंवार सबबी सांगत असल्याचे तर ४५ टक्के विद्यार्थ्यांनी गृहपाठ करण्यात आपण कधीना कधी टाळाटाळ करीत असल्याचे तसेच त्यासाठी वेगवेगळी कारणे देत असल्याचे कबूल केले.