Join us

‘जान्हवीला जामीन देऊ नका’

By admin | Updated: August 4, 2015 01:24 IST

पूर्व मुक्त मार्गावर(ईस्टर्न फ्री वे) दारूच्या नशेत अपघात करून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरच्या जामीन अर्जाला

मुंबई : पूर्व मुक्त मार्गावर(ईस्टर्न फ्री वे) दारूच्या नशेत अपघात करून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरच्या जामीन अर्जाला आरसीएफ पोलिसांनी विरोध केला आहे. तिच्याकडून घडलेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. शिवाय हा तिचा पहिलाच अपघात नाही. त्यामुळे जामीन दिल्यास तिच्याकडून अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचे प्रत्युत्तर सरकारी वकील अ‍ॅड. इक्बाल सोलकर यांनी सत्र न्यायालयात सादर केले. त्यावर दोन्ही बाजूंचे वकील उद्या युक्तिवाद करतील. जान्हवीने दारूच्या नशेत फ्री वेवर उलट्या दिशेने भरधाव आॅडी चालवून एका टॅक्सीला धडक दिली होती. त्यात दोघांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले होते.