मंत्रालयातील काम दोन शिफ्टमध्ये करा; वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 02:04 AM2021-02-24T02:04:54+5:302021-02-24T06:44:16+5:30

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यावेळी ते बोलत होते.

Do ministry work in two shifts; Choose Work from Home - CM Uddhav Thackeray | मंत्रालयातील काम दोन शिफ्टमध्ये करा; वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा - मुख्यमंत्री

मंत्रालयातील काम दोन शिफ्टमध्ये करा; वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा - मुख्यमंत्री

Next

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळ दोन शिफ्ट्समध्ये कशा रीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या.

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यावेळी ते बोलत होते. १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृती सुरु करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची उपस्थिती होती.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.  यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवी पद्धत सुरू करू

मुख्यमंत्री म्हणाले, आपण नवी पद्धत सुरु करून पाहू. ज्यामध्ये कामे संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील. कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पहावे.मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अभ्यागतांना मर्यादित प्रवेश 

मंत्रालयात दररोज अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढली आहे हे महासंघाने यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास
आणून दिले.यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे गरजेचे आहे, यावर चर्चाझाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातएक दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबतयोग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. 

Web Title: Do ministry work in two shifts; Choose Work from Home - CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.