Join us  

काळाचौकीत गरिबांना मोफत जेवण वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:07 AM

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कडक निर्बंध लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी स्वराज्य ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कडक निर्बंध लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी स्वराज्य फाऊंडेशनने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत जेवण वाटपाचा उपक्रम १५ एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे.

स्वराज्य फाऊंडेशनने काळाचौकी येथील शहीद भगतसिंह मैदानाच्या प्रवेशद्वारावर दुपारी १२ ते १ यावेळेत सामान्य नागरिकांसाठी मोफत जेवण वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. गरिबांना जेवण मोफत देऊन त्यांची किमान एकवेळची गरज भागवण्याचा स्वराज्य फाऊंडेशनचा प्रयत्न असल्याचे उदय पवार यांनी सांगितले‌.

या उपक्रमाबाबत बोलताना स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय पवार म्हणाले की, टाळेबंदीत जेवण मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची विशेषत: हातावर पोट असणाऱ्यांचे मागील टाळेबंदीत फार हाल झाले होते. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ एप्रिलपासून पुढील १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येणार नाही. यामुळे हातावर पोट असणारे टॅक्सी ड्रायव्हर, छोटे व्यावसायिक, कामगार, हातगाडीवाले, फेरीवाले यांची उपासमार होण्याची शक्यता आहे. स्वराज्य फाऊंडेशचा हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन कोलगे, यशवंत शेट्ये, फतेहसिंह गुजर, पत्रकार राजेंद्र साळसकर, निर्मला पवार, अशोक पवार, वैभव पवार, वैभव सावंत, किसन कासले, अभिषेक कुळ्ये आदी मान्यवर विशेष मेहनत घेत आहेत.

......................