Join us  

ऑस्‍टोमी रूग्‍णांना दिव्‍यांग दर्जा मिळावा; खासदार गजानन कीर्तिकर यांचे प्रतिपादन

By मनोहर कुंभेजकर | Published: February 08, 2024 5:32 PM

आग्रही मागणी आज संसदेत शुन्‍य प्रहारात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार  खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली.

मनोहर कुंभेजकर, मुंबई : भारतात सुमारे सहा लाख ऑस्‍टोमी रूग्‍ण असून त्‍यांचे मल-मूत्राचे विर्सजन नैसर्गिक मार्गाने होत नाही. शस्‍त्रक्रिया करून त्‍यांच्‍या पोटावर मल-मूत्र विसर्जनासाठी पॉलिथीन पिशवी बसवली जाते. त्‍यामुळे दैनंदिन जीवनात काम करताना त्‍यांना अनेक मर्यादांना सामोरे जावे लागते. गर्दीच्‍या ठिकाणी किंवा धावपळीत ही पिशवी फुटण्‍याची भिती त्‍यांना असते. एखाद्या दिव्‍यांग व्‍यक्‍तीला ज्‍याप्रमाणे हालचालींवर मर्यादा येतात, तशीच अवस्‍था ऑस्‍टोमी रूग्‍णांची होते. त्‍यामुळे ऑस्‍टोमी या रोगाचा दिव्‍यांग श्रेणीमध्‍ये समावेश करून त्‍या बाधीत रूग्‍णांना दिव्‍यांगांचा दर्जा देण्‍यात यावा, अशी आग्रही मागणी आज संसदेत शुन्‍य प्रहारात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार  खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली.

आपण  गेल्‍या तीन वर्षापासून सातत्‍याने या प्रश्‍नाचा केन्‍द्रीय आरोग्‍य मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑस्‍टोमी रूग्‍णांच्‍या पोटावर लावल्‍या जाणा-या पॉलिथीन पिशवीचा महिन्‍याचा तीन हजार रूपये खर्च गरीब रूग्‍णांना परवडणारा नसल्‍याने शासनाने ती विनामुल्‍य उपलब्‍ध करून द्यावी, ऑस्‍टोमी रूग्‍णांना रेल्‍वेमध्‍ये आरक्षित कोटा, प्रवास खर्चात सवलत व अन्‍य अत्‍यावश्‍यक सुविधा देण्‍यात याव्‍यात, अशा ही आग्रही मागणी खासदार कीर्तिकर यांनी केल्या.

टॅग्स :मुंबईगजानन कीर्तीकर