Join us  

दिंडोशीत प्रथमच जल संधारण प्रकल्प; पश्चिम उपनगरातील पहिला पकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2021 8:33 PM

आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नांना यश

मनोहर कुंभेजकर 

मुंबई--दिंडोशीत प्रथमच जल संधारण प्रकल्पाच्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याची मोठी बचत होणार आहे,तसेच पावसाळ्यात पाणी तुंबून होणाऱ्या पूरजन्य परिस्थितीला आळा बसणार आहे.तसेच पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढणार आहे. पश्चिम उपनगरातील हा पहिलाच पकल्प आहे.

दिंडोशी विधानसभा मतदारसंघातली क्रांतीनगर हा भाग संजय गांधी राष्ट्रीय वन उद्यानाच्या उतारावर वसलेला असून पावसाळ्यात उतारावरून येणाऱ्या वेगवान पाण्याच्या लोंढ्या सोबत वाहून येणारी दगड, माती खाली असणाऱ्या नाल्यात साचून त पूरपरिस्थितीवर निर्माण होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवर ताली बांधण्यात याव्यात जेणेकरून पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होऊन सोबत दगड - धोंडे, माती वाहून येणार नाही तसेच पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढेल अशी मागणी शिवसेना मुख्य प्रतोद,स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी मागील अनेक वर्षांपासून लावून धरली होती. मुंबई महानगर पालिकेने याकरता आवश्यक निधी वन विभागाला हस्तांतरित देखिल केला.

 आज शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार सुनील प्रभू यांच्या अथक प्रयत्नाने, दिंडोशी विधानसभा संघटक  विष्णु सावंत, प्रभाग क्रं. ३९ स्थानिक नगरसेविका विनया विष्णू सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे आज सदर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष  सुरुवात झाली. आज दुपारी आमदार सुनील प्रभू वनविभागाचे रेंज अधिकारी देसले यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी विष्णू सावंत , नगरसेविका विनया सावंत, शाखाप्रमुख रमेश कळंबे, उपविभाग समन्वयक सोपान राजूरकर, महिला  शाखा संघटक योगिता धुरी, शाखा समन्व्यक संतोष कांबळे, शिवसेना युवासेना, भा वि से चे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :सुनील प्रभूशिवसेना