दिंडोशीत महानगरपालिका करणार आता घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:57 PM2021-07-29T13:57:07+5:302021-07-29T13:58:47+5:30

मुंबईतील पहिलाच उपक्रम. मुंबईत रोज जमा होतो ८००० मेट्रिक टन कचरा.

In Dindoshi Municipal Corporation will now collect household organic waste | दिंडोशीत महानगरपालिका करणार आता घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन

दिंडोशीत महानगरपालिका करणार आता घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन

Next
ठळक मुद्देमुंबईतील पहिलाच उपक्रम.मुंबईत रोज जमा होतो ८००० मेट्रिक टन कचरा.

मनोहर कुंभेजकर

मुंबई- वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यात घनकचऱ्याचे एकत्रिकरण व त्याची विल्हेवाट ही एक पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाची समस्या बनली आहे. मुंबईत रोज ८००० मेट्रिक टन कचरा जमा होतो. मुंबई महानगर पालिका सुका व ओला कचरा असे वर्गीकरण करून  रजच्या कचऱ्याचे विघटन करते. मात्र आता घरात होणाऱ्या जैविक कचऱ्याची समस्या डोकं वर काढत आहे.दिंडोशीत मुंबई महानगर पालिका आता घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन करणार असून मुंबईतील हा पहिला उपक्रम आहे.

लोक सहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे. घनकचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही. याकरिता घरगुती सुका कचरा व ओल्या कचऱ्या सोबतच घरगुती जैविक धोकादायक कचरा विलीगीकरण करण्यात यावा या करिता गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्या पातळीवर विलगिकरण करावे व विल्हेवाट लावावी याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील कृती योजना तयार केली आहे.

दिंडोशी,कुरार येथील आकांक्षा बिल्डिंग,त्रिवेणी नगर परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी एकत्र येत लोकसभागातून अशा प्रकारे घरगुती जैविक धोकादायक विलगिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्थानिक स्थानिक आमदार, शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, माजी महापौर मुंबई, सुनिल प्रभू यांनी लोकमतला दिली. 

कचरा संकलनासाठी पुढाकार
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सहभागातून शिवसेना नेते,खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली  आमदार सुनिल प्रभू यांनी घरगुती जैविक धोका दायक कचरा विलगिकरण उपक्रमाकरिता घरगुती जैविक धोकादायक कचरा संकलन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जैविक कचऱ्याच्या विघटनासाठी त्यांनी कचरा पेट्या उपलब्ध करून  दिल्या आहेत. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आकांक्षा बिल्डिंग,कुरार,त्रिवेणी नगर परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी अशा प्रकारे घरगुती जैविक धोकादायक विलगिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या सहकारी गृहनिर्माण संस्थेला शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली स्थानिक आमदार, मुख्य प्रतोद, माजी महापौर मुंबई, सुनिल प्रभू यांनी घरगुती जैविक धोकादायक कचरा विलगिकरण उपक्रमाकरिता घरगुती जैविक धोकादायक कचरा संकलन पेट्या उपलब्ध करून दिल्या आहेत. जैविक धोका दायक कचरा विलगिकरण उपक्रमाकरिता घरगुती जैविक धोकादायक कचरा संकलन पेट्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पी उत्तर वॉर्ड मध्ये सदर योजना लोकप्रतिनिधी व लोकसभातून राबवणार असल्याचे आमदार प्रभू म्हणाले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी संस्थेने घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य असून इतर सहकारी गृहनिर्माण संस्थाकरिता एक मार्गदर्शक कृती योजना (रोड मॅप) होऊ शकेल अशा शब्दात आमदार सुनिल प्रभू यांनी संस्थेच्या निर्णयाचा गौरव केला.

Web Title: In Dindoshi Municipal Corporation will now collect household organic waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.