Join us  

सुनावणीदरम्यान कुरुंदकरने सादर केलेली डायरी खोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:07 AM

पनवेल सत्र न्यायालयात शनिवारी कंट्रोल रूमला वायरलेस नोंद घेणाऱ्या महिला पोलीस हवालदार कमल चव्हाण यांची उलट तपासणी पूर्ण झाली. ...

पनवेल सत्र न्यायालयात शनिवारी कंट्रोल रूमला वायरलेस नोंद घेणाऱ्या महिला पोलीस हवालदार कमल चव्हाण यांची उलट तपासणी पूर्ण झाली. यावेळी या प्रकरणातील साक्षीदार पोलीस नाईक विष्णू कर्डिले यांची मागील सुनावणीच्या वेळी सर तपासणी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी त्यांची उलट तपासणी होणार होती. मात्र, ते सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरन्ट काढले होते.

शनिवारी पनवेल सत्र न्यायालयात पोलीस नाईक कर्डिले हजर झाले होते. त्यानंतर न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी त्यांच्या नावाने काढलेले वॉरंट रद्द केल्यानंतर त्यांची उलट तपासणी पूर्ण झाली.

या सुनावणीच्या वेळी कर्डिले यांनी ज्या रात्री अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली, त्या रात्री दीड वाजेच्या सुमारास कुंदन भंडारी याला हॉटेल बंटास चौकात सोडल्याचे न्यायालयासमोर सांगितले. शनिवारी झालेल्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो, अश्विनी बिद्रेचे पती राजू गोरे, तपास अधिकारी एसीपी विनोद चव्हाण हजर होते. पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी ९ एप्रिल रोजी होणार आहे.