Join us

घाटकाेपर येथील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST

मुंबई : घाटकोपरच्या गंगावाडीत सुरू असलेला अवैध जुगार अड्डा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उद्ध्वस्त करत, १४ जणांवर कारवाई केली. ...

मुंबई : घाटकोपरच्या गंगावाडीत सुरू असलेला अवैध जुगार अड्डा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उद्ध्वस्त करत, १४ जणांवर कारवाई केली. यात पोकर खेळणाऱ्या आठ जणांचाही समावेश आहे. अटक आरोपींना न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या कारवाईत पोकरसाठी आवश्यक असलेले सुमारे साडेतीन लाख रुपयांचे साहित्य, चलन जप्त करण्यात आले.

........................................

भांडणाच्या रागातून तरुणाची हत्या

मुंबई : भांडूपच्या किस्मतनगर परिसरात अब्दुल रेहमान अब्दुल सहामा चौधरी (२०) या तरुणाची पूर्वीच्या भांडणातून भिंतीला डोके आपटून हत्या केली. २९ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चौधरीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत दोघांना अटक केली आहे.

...........................

नोकरीच्या आमिषाने मुंबईत आणले आणि वेश्याव्यवसायात ढकलले

दाेघांना अटक

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नोकरीचे आमिष दाखवून मुंबईत आणलेल्या तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने अटक केली.

उपेंद्र यादव आणि अशोक यादव अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीची नावे आहेत. पवईतील एका हॉटेलमध्ये सापळा रचून पाेलिसांनी ही कारवाई केली. तसेच झारखंड राज्यातील तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून वरील बाब उघडकीस आली. आरोपींनी वेश्याव्यवसायासाठी संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे ते ग्राहकांशी संपर्क साधत होते. याप्रकरणी पाेलीस त्यांची कसून चाैकशी करत आहेत.

......................