मुंबई : मुलुंड भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले असून, त्याद्वारे पैशांची मागणी होत असल्याबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीनुसार, सायबर पाेलीस अधिक तपास करत आहेत
...............................
कांदिवली गुन्हे शाखा कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हे शाखा नेहमीच तत्पर असते. याच गुन्हे शाखेच्या कक्ष ११च्या कांदिवली युनिटचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहआयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण उपस्थित होते.
..............................
किडनीच्या आजाराने पोलिसाचा मृत्यू
मुंबई : ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलात औदुंबर शेळके (५६) हे पाेलीस कार्यरत हाेते. सदैव तत्पर तसेच कर्तव्यदक्ष पाेलीस अशी ओळख असलेल्या शेळके यांना किडनीचा त्रास हाेता. याच किडनीच्या आजारामुळे सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.
..........................
.............................