Join us  

मॅटचे सदस्य प्रवीण दीक्षित यांच्यावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:37 AM

महाराष्ट्र प्रशासकीय लवादाचे (मॅट) सदस्य प्रवीण दीक्षित वृत्तवाहिन्यांवरील विशेष कार्यक्रमांत राजकीय विषय व कोरेगाव-भीमा दंगलीच्या पोलीस तपासाबद्दल एखाद्या आरएसएसच्या नेत्याप्रमाणे चर्चा करत असल्याचा आरोप करत मॅट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते व काही वकिलांनी त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी

मुंबई : महाराष्ट्र प्रशासकीय लवादाचे (मॅट) सदस्य प्रवीण दीक्षित वृत्तवाहिन्यांवरील विशेष कार्यक्रमांत राजकीय विषय व कोरेगाव-भीमा दंगलीच्या पोलीस तपासाबद्दल एखाद्या आरएसएसच्या नेत्याप्रमाणे चर्चा करत असल्याचा आरोप करत मॅट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते व काही वकिलांनी त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, यासाठी सरन्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे.प्रवीण दीक्षित यांनी एका वृत्तवाहिनीच्या ७ व ८ जूनच्या विशेष कार्यक्रमात कोरेगाव-भीमा दंगलीवर भाष्य केल्याने व या कार्यक्रमात मागासवर्गीयांचा उल्लेख दलित म्हणून केला आहे. त्याशिवाय त्यांनी या दंगलीचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वकील प्रकाश आंबेडकर आणि सुरेंद्र गडलिंग यांना जबाबदार ठरविले आहे, असे सदावर्ते यांनी पत्रात म्हटले आहे.