मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 06:07 AM2020-10-01T06:07:30+5:302020-10-01T06:07:42+5:30

राज्यात आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण कोविडमुक्त

Decrease in active patients in Mumbai, Pune, Nashik, Nagpur | मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट

Next

मुंबई : मागील ४-५ दिवसांमध्ये राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. त्यात मुख्यत: पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात दिवसभरात कोरोनाचे १९ हजार १६३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.६१ टक्के झाले आहे. मागील काही दिवसांत राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या घटत असून, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात बुधवारी १८ हजार ३१७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ४८१ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख ८४ हजार ४४६ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा ३६ हजार ६६२ आहे. मृत्युदर २.६५ टक्के आहे.
सध्या राज्यात २१ लाख ६१ हजार ४४८ व्यक्ती घरगुती तर २१,१७८ संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

मुंबईत २६ हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू
मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस शहर-उपनगरात रुग्ण निदानाचा आलेख चढताच असल्याचे दिसून आले. मुंबईत आतापर्यंत १ लाख ६९ हजार २६८ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २६ हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत दिवसभरात २ हजार ६५४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून ४६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, मुंबईत २ लाख ५ हजार २६८ कोरोनाबाधित आढळले असून मृतांची संख्या ८ हजार ९२९ झाली आहे.

च्मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के असून रुग्ण दुपटीचा काळ ६६ दिवसांवर आला आहे. शहर, उपनगरात मंगळवारपर्यंत ११ लाख १५ हजार ७११ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत चाळ व झोपडपट्टीत ६६५ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. तर १० हजार ४५० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. पालिकेने २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील ९ हजार ७४९ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.

Web Title: Decrease in active patients in Mumbai, Pune, Nashik, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.