Join us  

हिवाळी वेळापत्रक रद्द करण्याचा निर्णय, प्रवासी संघटनांपुढे रेल्वे प्रशासन झुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 2:42 AM

हवामानातील बदलामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात धूरके जमा होत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने कसारा आणि कर्जत मार्गावरील काही फे-यांच्या वेळेत बदल केला. या बदलामुळे प्रवाशांचा फायदा कमी आणि मनस्तापच जास्त सहन करावा लागला.

मुंबई : हवामानातील बदलामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात धूरके जमा होत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने कसारा आणि कर्जत मार्गावरील काही फे-यांच्या वेळेत बदल केला. या बदलामुळे प्रवाशांचा फायदा कमी आणि मनस्तापच जास्त सहन करावा लागला. यामुळे प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची सोमवारी भेट घेतली. प्रवासी संघटनांचा आक्रमकपणा पाहून, मंगळवारी सायंकाळी हिवाळी वेळापत्रक रद्द करण्याची घोषणा केली. २१ डिसेंबरपासून पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे लोकल फेºया होतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.‘ओखी’ वादळानंतर मुंबई उपनगरात धूरक्यांनी आच्छादली होती. यामुळे रेल्वेसेवा बाधित झाली. रेल्वे रुळावर कमी दृष्यमानतेमुळे लोकल अतिशय संथ गतीने धावत होत्या. परिणामी, हे टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला. हे वेळापत्रक रद्द करण्यासाठी प्रवासी संघटनांचे शिष्टमंडळांनी सोमवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेतली. मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ही बैठक पार पडली. बैठकीत लोकलच्या हिवाळी वेळापत्रकांमुळे होणाºया अडचणींचा पाढा रेल्वे अधिकाºयांसमोर वाचून दाखविला. अखेर रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनेपुढे झुकत, हिवाळी वेळापत्रक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.उशिरा सुचलेले शहाणपणशहरातील लाइफ लाइन असलेल्या लोकल फेºयांवर मुंबईकरांचे वेळापत्रक अवलंबून आहे. यामुळे कोणतेही बदल करताना, मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र, मध्य रेल्वेने कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता एककल्ली निर्णय घेतला. १८ डिसेंबरपासून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सध्या हा निर्णय रद्द केला आहे. यामुळे मध्य रेल्वेचा हा निर्णय म्हणजे जबाबदार प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. रेल्वेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत.- शैलेश राऊत, प्रसिद्धीप्रमुख,कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना.अपयश झाकण्यासाठी धूरक्याचे कारणमध्य रेल्वेवर रोज १,६०० लोकल फेºया होतात. यातून सुमारे४० लाख प्रवासी प्रवास करतात. हिवाळी वेळापत्रकात ११ लोकल फेºयांच्या वेळा १० ते १५ मिनिटे नियमित वेळांच्या आधी करण्यात आल्या. हे नवीन हिवाळी वेळपत्रक सोमवारपासून लागू करण्यात आले होते. मध्य रेल्वे आपले अपयश झाकण्यासाठी हवामानातील बदल आणि धूरके यांचा आधार घेत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.

टॅग्स :मुंबई लोकल