Join us

सासूचा मृत्यू; जावयास पाच वर्षे सक्तमजूरी

By admin | Updated: December 22, 2014 22:25 IST

जावयाने केलेल्या मारहाणीत सासूचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाचे न्या. व्ही.व्ही.वीरकर यांनी जावई सुरेश कोंब याला पाच वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली.

ठाणे: जावयाने केलेल्या मारहाणीत सासूचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाचे न्या. व्ही.व्ही.वीरकर यांनी जावई सुरेश कोंब याला पाच वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली. ही घटना २ आॅगस्ट २०११ रोजी वाड्यात घडली होती. मृत निर्मला बराफ (६५) हिच्या मुलीसोबत आरोपी सुरेशचे लग्न झाले. सुरेश हा पत्नीचा छळ करीत होता. यालाच कंटाळून विमलने विष प्राशन करून आत्महत्या केली. विमलच्या आत्महत्येस सुरेश जबाबदार असल्याचे निर्मला वारंवार बोलत असे. हाच राग मनात धरून त्याने लाकडी दांडक्याच्या सहाय्याने निर्मला यांना मारहाण केली होती. (प्रतिनिधी)