Join us

कळंबमध्ये बालिकेचा कुपोषणाने मृत्यू

By admin | Updated: October 28, 2014 22:51 IST

कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात आजही मोठय़ा प्रमाणात कुपोषणाचा विळखा कायम असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत : कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात आजही मोठय़ा प्रमाणात कुपोषणाचा विळखा कायम असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्हय़ात सर्वात जास्त कुपोषण कर्जत तालुक्यात आहे, पण सरकारी यंत्नणोला त्याचे काही देणोघेणो नसल्याचे दिसून आले आहे. 
तालुक्यातील कळंब येथे एका सव्वा वर्षाच्या बालिकेला कुपोषणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मात्न एकात्मिक बालविकास विभाग आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवणारे अबरार तांबोळी यांना रोजगारासाठी आपले राहण्याचे ठिकाण बदलावे लागत होते. तीन वर्षापूर्वी नेरळ येथील मोहाचीवाडी भागात राहणारे तांबोळी यांच्या पत्नी नसीमा यांनी 18 जुलै 2क्13 रोजी दुस:या अपत्यास जन्म दिला. दामत  गावात राहत असताना अबरार तांबोळी यांची पत्नी नसीमा यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात बालिकेस जन्म दिला. 
2क्14 च्या जानेवारी महिन्यात तांबोळी कुटुंब कळंब येथे रहायला गेले.  त्याआधी सहा महिने नसीमा तंबोळी या नेरळ प्रथामिक आरोग्य केंद्रात आलिया या बालिकेस लसीकरण करण्यासाठी घेवून जात. नंतर कळंब येथे रहायला गेल्यानंतरही नसीमा या आपल्या बालिकेस लसीकरणासाठी तेथील एकात्मिक बालविकास विभागाच्या अंगणवाडी शाळेत नेत असत. मात्र असे असताना कळंब किंवा दामत येथे आलियाचे वजन कमी आहे, ती बालिका कुपोषित आहे, याची दखल एकात्मिक बालविकास विभागाने घेतली नाही. या विभागाच्या दुर्लक्षामुळे आलिया कुपोषणाची बळी ठरल्याचे पालकांचे म्हणणो आहे. 
सप्टेंबर महिन्यात आलिया आजारी झाल्याने तिच्या घरच्यांनी तिला प्रथम कळंबमधील  खाजगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. तिथे  प्रकृती सुधारत नसल्याने अखेर कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथे कुपोषणाच्या विळख्यात असलेल्या आलियाला ठाणो येथील महापालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याची सूचना केली.
24 सप्टेंबर रोजी ठाणो महापालिकेच्या दवाखान्यात दाखल केल्यानंतर आलिया 9 ऑक्टोबर्पयत उपचार घेत होती. तिची प्रकृती बरी झाल्याने तिला घरी सोडण्यात आले. मात्र 17 ऑक्टोबरला  आलियाचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण शासकीय यंत्नणा खडबडून जागी झाली. एकात्मिक बाल विकास विभागाचे तात्पुरता पदभार सांभाळणारे अधिकारी कळंब येथे पोहचले. त्यांनी आलियाचा मृत्यू कुपोषणामुळे झाला असल्याचे मान्य केले आहे. पण आलियाची नोंद अंगणवाडी शाळेत नसल्याचे सांगून आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. 
 
गटविकास अधिका:यांनी हात झटकले
4सप्टेंबर महिन्यात आलिया आजारी झाल्याने तिच्या घरच्यांनी तिला प्रथम कळंबमधील  खाजगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. तिथे  प्रकृती सुधारत नसल्याने अखेर कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. 
4तेथे कुपोषित आलियाला ठाणो येथील महापालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याची सूचना केली.
4याबाबत कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. व्ही. थुले यांच्याकडे विचारणा केली असता, आमच्या अंगणवाडीमध्ये बालिका आलीच नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले आहेत.