Join us  

पुनर्मूल्यांकन निकालाचीही डेडलाइन चुकली, विद्यापीठाने परीक्षा केल्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 6:00 AM

मुंबई विद्यापीठात यंदा पुनर्मूल्यांकनाचा टक्का वाढला आहे. परीक्षा सुरू होण्याआधी विद्यापीठ पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मुंबई : मुंबई विद्यापीठात यंदा पुनर्मूल्यांकनाचा टक्का वाढला आहे. परीक्षा सुरू होण्याआधी विद्यापीठ पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण सहा दिवस उलटूनही विद्यार्थ्यांच्या हातात पुनर्मूल्यांकनाचे निकाल आलेले नाहीत. त्यामुळे सोमवारपासून परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत.मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात आली. आॅनलाइनमुळे निकालात गोंधळ झाला. या निकालाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाने २७ हजार पुनर्मूल्यांकनाचे निकाल ७ दिवसांत जाहीर करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. पण सहा दिवस उलटूनही विद्यापीठाने अजूनही तब्बल १३ हजारहून अधिक पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर केले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.विद्यापीठ सध्या परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचे काम एकत्रितपणे सांभाळत आहे. पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावण्यासाठीदेखील विद्यापीठ आॅनलाइन पद्धतीचा वापर करीत आहे. त्यामुळे निकाल लावण्यास वेळ लागत असल्याची माहिती मिळाली आहे.विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचा निकाल हातात नसल्याने परीक्षा द्यायच्या की नाही, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. विद्यापीठात सध्या मनमानी कारभार सुरू आहे.शिक्षणमंत्र्यांनीही पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावण्यास विद्यापीठाला सांगितले होते. पण विद्यापीठ कोणालाच जुमानत नसल्याचा आरोप स्टुण्डट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केला आहे.

टॅग्स :मुंबईविद्यापीठ