Join us  

मंत्रालयात कॅशियरचा ३२ लाखांचा डल्ल्ला, मरिन ड्राइव्ह पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:09 AM

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा पगार तसेच अन्य भत्त्यांच्या पैशांतून ३२ लाखांच्या रकमेवर डल्ला मारणा-या कॅशियर नितीन साबळेला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो अशाप्रकारे फसवणूक करीत होता.

मुंबई : मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा पगार तसेच अन्य भत्त्यांच्या पैशांतून ३२ लाखांच्या रकमेवर डल्ला मारणा-या कॅशियर नितीन साबळेला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो अशाप्रकारे फसवणूक करीत होता.मुळचा सातारा येथील रहिवासी असलेला साबळे चिंचपोकळी परिसरात कुटुंबासह राहतो. तो मंत्रालयातील रोखपाल विभागात कॅशियर आहे. याच दरम्यान त्याने कर्मचाºयांच्या पैशांवर हात साफ करण्यास सुरुवात केली. अखेर १५ जून रोजी साबळेचे बिंग फुटले आणि मंत्रालयातील डेस्क अधिकारी किशोर सोईतकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.पोलिसांनी त्याला अटक केली असून यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचाही तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबई