Join us  

चेंबूर येथे सायन-पनवेल मार्गावर पथदिवे बंद असल्याने अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 1:54 AM

वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जोरात पाऊस पडत असताना या ठिकाणी एखाद्या पादचाºयाचा अपघात घडण्याचीही शक्यता आहे.

मुंबई : चेंबूर येथील सायन-पनवेल मार्गावर अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. यामुळे रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. चेंबूरच्या डायमंड गार्डन ते उमर्शी बाप्पा चौक या पट्ट्यात पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळेस पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जोरात पाऊस पडत असताना या ठिकाणी एखाद्या पादचाºयाचा अपघात घडण्याचीही शक्यता आहे.मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मागील वर्षभरात या मार्गावर अनेकदा पथिदवे बंद अवस्थेत आढळून येत आहेत. यामुळे मेट्रोच्या बॅरिकेटच्या आडून पादचारी रस्ता ओलांडत असल्यास अंधार असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी या मार्गावर अनेक अपघातही घडले आहेत. लॉकडाउनच्या काळात रस्ते काही प्रमाणात मोकळे असल्याने वाहनांचा वेगही वाढला. यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पदपथावरील काही नाल्यांची झाकणे उघडी असल्याने अंधारात येथे पादचारी नाल्यात पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. संबंधित प्राधिकरणाने या समस्येकडे लक्ष देऊन या मार्गावरील दिवे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.