मुंबई : लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरामुळे अनेक प्रवासी जखमी होण्याच्या घटनांमुळे हे अंतर कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेत त्यानुसार प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र अद्यापही ९३ टक्के स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची धोकादायक असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे स्थानकांवर अस्वच्छता, फेरीवाले आणि भिकारी यांचे प्रमाणही वाढल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या संस्थेकडून करण्यात आलेल्या ३0 स्थानकांचा सर्व्हेक्षणात प्रवाशांना लोकलमध्ये चढताना आणि उतरताना त्रासदायक ठरणारा प्लॅटफॉर्म आणि लोकलमधला गॅप, तसेच फेरीवाले आणि भिकाऱ्यांची संख्या, रूळ ओलांडू नये यासाठी करण्यात आलेली सुविधा यासह अनेक समस्या आणि सुविधांची माहिती घेतली. यामध्ये ९३ टक्के स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची अजूनही वाढलेली नसल्याचे समोर आले आहे. यात पश्चिम, मध्य रेल्वेची मेन आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बरचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. तर दहा टक्के स्थानकांवरील सर्वेक्षणात प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. हा सर्व्हे मनिलाइफ या संस्थेकडून करण्यात आला आहे. सर्व्हेत आणखी काय?५७ टक्के स्थानकांवर अजूनही रूळ ओलांडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.६३ टक्के स्थानकांवरील अॅम्ब्युलन्स स्थानक परिसराच्या बाहेरच उभ्या केल्या जातात. एटीव्हीएममधून तिकीट घेण्यासाठी ३0 ते ५0 प्रवासी प्रत्येक स्थानकावर उभे असतात.
९३ टक्के स्थानकांच्या फलाटांची उंची धोकादायक
By admin | Updated: July 29, 2015 03:36 IST