Join us  

धोका कायम ! राज्यात ५९ हजार ९०७ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात बुधवारी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख चढा राहिल्याचे दिसून आले. दिवसभरात ५९ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख चढा राहिल्याचे दिसून आले. दिवसभरात ५९ हजार ९०७ रुग्णांचे निदान झाले, तर मागील २४ तासांत सर्वाधिक म्हणजे ३२२ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख ७३ हजार १६२ झाली असून, बळींचा आकडा ५६ हजार ६५२ झाला आहे. राज्यात ५ लाख १ हजार ५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात दिवसभरात ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २६ लाख १३ हजार ६२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ८२.३६ टक्के झाले असून, मृत्यूदर १.७९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ११ लाख ४८ हजार ७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या २५ लाख ७८ हजार ५३० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून, २१ हजार २१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

बुधवारी नोंद झालेल्या ३२२ मृत्यूंपैकी १२८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ११९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ३२२ मृत्यूंमध्ये मुंबई २४, ठाणे ६, ठाणे मनपा ४, नवी मुंबई मनपा १२, भिवंडी निजामपूर मनपा १, वसई विरार मनपा २०, पनवेल मनपा ४, नाशिक ३, नाशिक मनपा ११, अहमदनगर २, अहमदनगर मनपा १, धुळे २, जळगाव ३, जळगाव मनपा ६, नंदुरबार १९, पुणे ७, पुणे मनपा ५, सोलापूर १०, सोलापूर मनपा १०, कोल्हापूर मनपा १, सांगली २, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग ४, औंरगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, जालना २१, परभणी ५, परभणी मनपा ५, लातूर मनपा १, उस्मानाबाद ७, बीड ११, नांदेड १५, नांदेड मनपा २८, अकोला १, अकोला मनपा १, यवतमाळ ६, बुलढाणा ३, वाशिम २, नागपूर १०, नागपूर मनपा ३१, वर्धा ५, भंडारा २, गोंदिया २, गडचिरोली ३ इ. रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात ६० टक्क्यांहून अधिक अतिदक्षता खाटा आरक्षित

कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्स – ८०.५१ टक्के भरले

कोविड संशयित रुग्णांसाठी बेड्स – १७.२७ टक्के भरले

ऑक्सिजन बेड्स – ३२.७७ टक्के भरले

आयसीयू बेड्स – ६०.९५ टक्के भरले

व्हेंटिलेटर्स – ३३.९७ टक्के लावले आहेत

एकूण रुग्णांपैकी ६०.७ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात

तर ३९.३ टक्के रुग्ण विविध सुविधांमध्ये आणि रुग्णालयांत दाखल

सात दिवसांत ३ लाख ६० हजार १९३ रुग्ण

१ एप्रिल – ४३१८१

२ एप्रिल – ४७८२७

३ एप्रिल – ४९४४७

४ एप्रिल – ५७०७४

५ एप्रिल – ४७२८८

६ एप्रिल – ५५,४६९

७ एप्रिल – ५९९०७