Join us  

दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता लागू होणार सातवा वेतन आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 1:24 AM

शासनाने राज्य शासकीय कर्मचाºयांना तसेच निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू केला आहे.

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच निमशासकीय कार्यालयातील कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत. त्याच धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळातील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाच्या शिफारशी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात याव्यात याकरीता महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी वारंवार या विषयावर व्यवस्थापनाशी चर्चा व पाठपुरावा करीत होते.महामंडळाचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांनी चित्रनगरीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाच्या शिफारशी महामंडळास लागू करण्याचे नुकतेच सांस्कृतिक मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू केला आहे. त्याच धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाच्या शिफारशी पूर्वलक्षी प्रभावाने लागू कराव्यात, अशी मागणी चित्रनगरीच्या अधिकारी व कर्मचाºयांनी यावेळी केली. चर्चेअंती दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळास ७ वा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य विभागास देण्यात आले आहेत.