मुंबईत दादर, महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 06:29 AM2019-10-04T06:29:25+5:302019-10-04T06:29:53+5:30

‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ याद्वारे केलेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानक मुंबईत आणि महाराष्ट्रात सोलापूर स्थानक अव्वल असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Dadar in Mumbai, Solapur is the cleanest station in Maharashtra | मुंबईत दादर, महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक

मुंबईत दादर, महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक

googlenewsNext

मुंबई : ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ याद्वारे केलेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकमुंबईत आणि महाराष्ट्रात सोलापूर स्थानक अव्वल असल्याची नोंद करण्यात आली आहे.

एका वर्षाला ५०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवून देणारे आणि २ कोटींहून जास्त प्रवासी प्रवास करणारे दादर स्थानक स्वच्छतेच्या यादीत मुंबईत प्रथम क्रमांकावर आले. तर एका वर्षाला १०० ते ५०० कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या आणि १ ते २ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करणाºया महाराष्टÑातील सोलापूर या स्थानकाला स्वच्छतेसाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे. हे स्थानक मध्य रेल्वे मार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ स्थानक असल्याची सर्वेक्षणात नोंद करण्यात आली आहे.

‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ यांच्या सर्र्वेक्षणानुसार स्वच्छतेच्या वर्गवारीच्या यादीत दादरनंतर पुणे, सीएसएमटी, कल्याण, ठाणे, एलटीटी, पनवेल या स्थानकांचा क्रमांक लागला. तर, सोलापूर स्थानकानंतर नाशिक रोड, नागपूर या स्थानकांचा क्रमांक लागला.
या सर्वेक्षणात प्रत्येक स्थानकाला १ हजारपैकी गुण देण्यात आले. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील सोलापूरला ८८७.१८, दादरला ८६४.७९, पुण्याला ८४८.३९, नाशिक रोडला ८०८.४९, नागपूरला ७९५.९२, सीएसएमटी ७३५.२९, कल्याणला ७०४, ठाण्याला ७०१.७३, एलटीटीला ६६६.९९, पनवेलला ६५३.०७ गुण मिळाले आहेत.

अशी झाली स्वच्छतेची वर्गवारी
सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील प्रत्येक स्थानकाची प्रवासी संख्या आणि त्यातून मिळणारे उत्पन्न अशाप्रकारे स्थानकांची वर्गवारी करण्यात आली होती. त्यानुसार उपनगरी नसलेले (एनएसजी)अशी विभागणी करण्यात आली. या एनएसजीची दोन वर्गात उप वर्गवारी करण्यात आली होती.

एनएसजी १ मध्ये एका वर्षाला ५०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवून देणारे आणि २ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करणाºया स्थानकांचा समावेश होता. तर, एनएसजी २ मध्ये एका वर्षाला १०० ते ५०० कोटींचा महसूल मिळवून देणारे आणि १ ते २ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करणाºया स्थानकांचा समावेश होता. या दोन्ही वर्गवारीचा अभ्यास करून स्वच्छतेच्या स्थानकाची यादी करण्यात करण्यात आली. त्यानुसार एनएसजी १ मध्ये मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाने तर एनएसजी २ मध्ये सोलापूर स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला.

Web Title: Dadar in Mumbai, Solapur is the cleanest station in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.