Join us

मुंबईतील क्रॉर्फड मार्केटमध्ये भीषण आग, 100 दुकानं जळून खाक

By admin | Updated: October 25, 2015 10:46 IST

दक्षिण मुंबईतल्या गजबजलेल्या क्रॉफ्रर्ड मार्केटमध्ये सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मार्केटमधल्या फळ बाजाराला ही आग लागली आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.२५ - दक्षिण मुंबईतल्या गजबजलेल्या क्रॉफ्रर्ड मार्केटमध्ये सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मार्केटमधल्या फळ बाजाराला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पालिका आयुक्त अजोय मेहता घटनास्थळी पोहचले आहेत.फळ बाजाराशेजारील असणाऱ्या लाकडी पुठ्ठ्यांचं पॅकिंग जिथे होतं तिथे सुरुवातीला ही आग लागली. त्यानंतर ही आग फळ बाजारापर्यंत पोहचली. यामुळे आगीत जवळपास 100 दुकानांचं नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.क्रॉर्फड मार्केटमधील फळ बाजारातील हा भाग अतिशय दाटीवाटीचा असून जागा अपुरी असल्याने तिथवर फायर इंजिन पोहचण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमनच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. आगीचे कारण मात्र, अद्याप समजू शकलेले नाही.