Join us  

रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची गुन्हे शाखेकड़ून धरपकड़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:05 AM

दुकलीकडून २८४ रेमडेसिवीर जप्तदुकलीकडून २८४ रेमडेसिवीर जप्तलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे संकट ...

दुकलीकडून २८४ रेमडेसिवीर जप्त

दुकलीकडून २८४ रेमडेसिवीर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे संकट वाढत असताना राज्यात रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा भासत आहे. अशात, दुसरीकडे त्याचा काळाबाजार सुरु असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर येत आहे. गुन्हे शाखेने अशाप्रकारे काळाबाजार करणाऱ्यांची धरपकड़ सुरु केली आहे. गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवायांमध्ये एकूण २८४ रेमडेसिवीर लसी जप्त करण्यात आल्या आहेत.

या औषधाची संबंधितांकडून ७ ते ८ हजार रूपयांना विक्री केली जात होती. सरकारकड़ून या औषधाची १,१०० ते १,४०० रुपये किंमत ठरविण्यात आली आहे.

जोगेश्वरी परिसरामध्ये ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार केला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष १०ने एफडीएच्या पथकासह गुरूवारी सापळा रचून सरफ़राज़ जावेद हुसेन (३८) या तरुणाकड़ून रेमडेसिवीरच्या १२ लसी जप्त केल्या. याप्रकरणी हुसेनला अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या कारवाईत आरोपीकड़ून रेमडेसिवीरच्या २७२ लसी जप्त करण्यात आल्या आहेत. यात फार्मा कंपनीच्या जावेद अख्तर अब्दुल रेहमान शेख याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत एकूण २८४ रेमडेसिवीरच्या लसी जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी अंधेरी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपींना अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याविषयी दोघांकड़े अधिक तपास सुरु आहे तसेच असा काळाबाजार करणाऱ्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना जास्तीचे पैसे देत अशा लसी खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे.

....