Join us  

‘ट्रायबल सिक्युरिटी फोर्स’ विद्यार्थ्यांसाठी निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 5:28 AM

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळण्याच्या दृष्टिने त्यांच्यातील शारिरीक क्षमतेचा विचार होणे आवश्यक आहे.

मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळण्याच्या दृष्टिने त्यांच्यातील शारिरीक क्षमतेचा विचार होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठी ‘ट्रायबल सिक्युरिटी फोर्स’ निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक गुरुवारी मंत्रालयात पार पडली. आदिवासी विकास विभागाचे उप सचिव लक्ष्मीकांत ढोके, वरिष्ठ अधिकारी तसेच ‘इंडियन आय सिक्युरिटी’चे प्रतिनिधी उपस्थित होते.डॉ. फुके म्हणाले की, ‘ट्रायबल सिक्युरिटी फोर्स’ निर्माण करण्याबाबत आवश्यक असलेला प्रस्ताव तातडीने तयार करण्यात यावा. आदिवासी विद्यार्थ्यांचे शरीर मुळातच काटक असल्याने त्यांना शारीरिक क्षमतेवर आधारित रोजगार उपलब्ध करुन दिल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिक/ पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी शारिरीक प्रशिक्षण दिल्यास त्यांना कायमस्वरुपी नोकरी मिळण्यास मदत होणार आहे.