ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 02:20 PM2021-04-25T14:20:08+5:302021-04-25T14:21:19+5:30

Covid corruption of Thackeray government allegations by Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार म्हटलं आहे. 

Covid corruption of Thackeray government; Kirit Somaiya filed a petition with the Lokayukta and ACB | ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल 

ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देरेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या वेगवेगळ्या किंमत आणि सुरु असलेला भ्रष्टाचाराप्रकरणी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) येथे याचिका दाखल केली आहे.

राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. कोरोनासाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमरता त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांची दमछाक झाली आहे. त्यातच राज्यात वेगवेगळ्या किंमतींना रेमडेसिवीर विकत घेण्याची ऑर्डर काढली आहे. मात्र, रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या वेगवेगळ्या किंमत आणि सुरु असलेला भ्रष्टाचाराप्रकरणी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) येथे याचिका दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार म्हटलं आहे. 

 

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून एप्रिल २०२१ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शन १५६८ रुपयांना खरेदी करण्याची ऑर्डर काढली, तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने १३११ रुपये, हाफकिन इन्स्टिट्यूटने ६६५.८४ रुपये तर मीराभाईंदर महानगर पालिकेने ६६५.८४ रुपयांना विकत घेण्याची ऑर्डर काढली. मग या खरेदीच्या किंमतीत इतकी तफावत असल्याने यात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत याचिका लोकायुक्त आणि एसीबीकडे दाखल केली असल्याचे देखील सोमय्या यांनी सांगितले आहे. 

नुकताच राज्यात कोव्हीड काळात कोट्यवधी रुपयांचा ऑक्सिजन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. या ऑक्सिजन घोटाळ्याबाबत लवकरच काळी पत्रिका प्रसिद्ध करुन, राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता. 

कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदने केलेल्या साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळ्याचा आरोप भाजपने केला होता. मास्क, सॅनिटायझर तसेच अन्य आवश्यक साहित्य चढ्या दराने खरेदी करुन यंत्रणेतील लोकांनी मोठा डल्ला मारल्याचं भाजप सदस्यांचे म्हणणं होतं. पण सत्ताधारी महाविकास आघाडीने मात्र विरोधकांच्या या सर्व आरोपाचे खंडन केलं होतं.

 

 

Web Title: Covid corruption of Thackeray government; Kirit Somaiya filed a petition with the Lokayukta and ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.