सायन रुग्णालयात कोव्हॅक्सिनच्या चाचणीला सुरुवात  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 07:41 AM2020-12-11T07:41:17+5:302020-12-11T07:42:36+5:30

मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयानंतर आता सायन रुग्णालयात ५ डिसेंबरपासून कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे.

Covaxin testing begins at Sion Hospital | सायन रुग्णालयात कोव्हॅक्सिनच्या चाचणीला सुरुवात  

सायन रुग्णालयात कोव्हॅक्सिनच्या चाचणीला सुरुवात  

Next

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयानंतर आता सायन रुग्णालयात ५ डिसेंबरपासून कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाल्यानंतर भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात केल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

पालिकेच्याच सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असून, शनिवार ते आतापर्यंत १५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

कोव्हॅक्सिन ही लस दिल्यावर त्या स्वयंसेवकावर अर्धा तास देखरेख ठेवून काही त्रास होत नसल्यास घरी पाठवण्यात येते.  घरी गेल्यानंतरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचे डॉ. एन. अवध यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाचा फैलाव होणार नाही म्हणून गांभीर्याने काळजी घेतली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून पालिका युद्धपातळीवर काम करत असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.

Web Title: Covaxin testing begins at Sion Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.