प्रियांका सिंहवरील गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार, मितू सिंहला दिलासा; सुशांतच्या बहिणींविराेधातील रिया चक्रवर्तीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 03:05 AM2021-02-16T03:05:21+5:302021-02-16T03:06:06+5:30

Riya Chakraborty's complaint against Sushant's sisters : रियाने आम्हाला लक्ष्य करण्यासाठी कुहेतून एफआयआर नोंदविला, असा दावा करीत सुशांतच्या दोन्ही बहिणींनी एफआयआर नोंदविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Court refuses to quash Priyanka Singh case, consoles Mitu Singh; Riya Chakraborty's complaint against Sushant's sisters | प्रियांका सिंहवरील गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार, मितू सिंहला दिलासा; सुशांतच्या बहिणींविराेधातील रिया चक्रवर्तीची तक्रार

प्रियांका सिंहवरील गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार, मितू सिंहला दिलासा; सुशांतच्या बहिणींविराेधातील रिया चक्रवर्तीची तक्रार

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची बहीण प्रियांका सिंह हिच्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला, तर सुशांतसिंहची दुसरी बहीण मितू सिंह हिच्यावरील गुन्हा रद्द केला. या दोघींवर सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दोन्ही बहिणींनी बेकायदा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन पुरविले व त्यातूनच सुशांतविषयी अघटित घडल्याचा आरोप केला आहे.
सुशांतच्या मृत्युमागे रियाचा हात असल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुशांतला त्याच्या दोन बहिणींनी बेकायदा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन पुरविले आणि त्यातूनच सुशांतविषयी अघटित घडले असावे, असा आरोप करीत रियाने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली.
रियाने आम्हाला लक्ष्य करण्यासाठी कुहेतून एफआयआर नोंदविला, असा दावा करीत सुशांतच्या दोन्ही बहिणींनी एफआयआर नोंदविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने निकाल दिला.
सुकृतदर्शनी प्रियांका सिंहवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत पुरावे आहेत, तर मितू सिंहवर केस नसल्याचे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने प्रियांका सिंहवरील गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आणि मितू सिंहला दिलासा देत तिच्यावरील गुन्हा रद्द केला.
गेल्यावर्षी १४ जून रोजी अभिनेता सुशांतने घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीने आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा व त्याची फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली. सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्यानंतर रियाने सुशांतच्या बहिणींविरोधात गुन्हा वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदविला. पोलिसांनी हा तपास सीबीआयकडे वर्ग केला.

बनावट प्रिस्क्रिप्शन घेतल्याचा आराेप 
गेल्यावर्षी ७ सप्टेंबर रोजी वांद्रे पोलिसांनी प्रियांका सिंह, मितू सिंह आणि दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. रियाचा आराेप आाणि तिने यासंदर्भात केलेल्या तक्रारीनुसार, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी सुशांतच्या बहिणींनी तरुण कुमार यांच्याकडून अँटी डिप्रेशनसंदर्भात बनावट प्रिस्क्रिप्शन घेतले.

Web Title: Court refuses to quash Priyanka Singh case, consoles Mitu Singh; Riya Chakraborty's complaint against Sushant's sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.