Join us  

न्यायालयाने केले आरोप निश्चित, सोहराबुद्दिन, प्रजापती बनावट चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 6:01 AM

मुंबई : सोहराबुद्दिन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आरोपींवर मंगळवारी आरोप निश्चित केले.

मुंबई : सोहराबुद्दिन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आरोपींवर मंगळवारी आरोप निश्चित केले. हत्या, अपहरण, कट आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत १६ आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. काही आरोपींचे अर्ज एकतर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली नाही, अशी माहिती सीबीआय अधिकाºयाने दिली.हत्या, अपहरण, कट रचणे, पुरावे नष्ट करणे व शस्त्रास्त्र कायद्यातील काही कलमांतर्गत १६ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोप निश्चित केल्यानंतर सर्व आरोपींनी आपण निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले.सोहराबुद्दिन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक केमसधून विशेष सीबीआय न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, राजस्थानचा व्यावसायिक विमल पटनी, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी. सी. पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक गीता जोहरी, गुजरात पोलीस अधिकारी अभय चुदासमा आणि एन. के. आमिन यांची आरोपमुक्तता केली आहे.नोव्हेंबर २००५मध्ये सोहराबुद्दिन शेख व त्यांची पत्नी कौसरबी हैदराबादहून सांगलीला जात असताना त्यांना गुजरात एटीएसने ताब्यात घेतले. त्यानंतर बनावट चकमकीद्वारे त्यांची हत्या केली.तसेच या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचीही बनावट चकमकीद्वारे हत्या करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.>२०१२मध्ये मुंबईत२०१२ मध्ये सीबीआयच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने शेख चकमक प्रकरण मुंबईत वर्ग केले़