Join us

डोळ्यांच्या उपचारांचा खर्च हा व्यावसायिक खर्च नाही

By admin | Updated: October 30, 2015 01:01 IST

वकील किंवा सॉलिसिटर यासारख्या एखाद्या व्यावसायिकाने डोळ््यांवरील उपचारांसाठी केलेला खर्च हा त्याच्या व्यावसायिक खर्चात येत नाही.

मुंबई: वकील किंवा सॉलिसिटर यासारख्या एखाद्या व्यावसायिकाने डोळ््यांवरील उपचारांसाठी केलेला खर्च हा त्याच्या व्यावसायिक खर्चात येत नाही. परिणामी, प्राप्तिकर कायद्यानुसार एकूण उत्पन्नाचा हिशेब करताना असा खर्च वजावटीस पात्र ठरत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.धिमंत ठक्कर या मुंबईतील एका सॉलिसिटरचा १९८६-८७ या वर्षासाठीचा प्राप्तिकर निर्धारित करताना उपस्थित झालेला हा मुद्दा गेली २० वर्षे प्रलंबित होता. प्राप्तिकर अधिकारी, प्राप्तिकर आयुक्त (अपील) आणि प्राप्तिकर अपिली न्यायाधिकरण या सर्वांनी ठक्कर यांचे म्हणणे अमान्य केले होते. त्यानंतर प्राप्तिकर कायद्याच्या कलम २५६ (१) अन्वये हा मुद्दा निर्णायक निकालासाठी उच्च न्यायालयाकडे आला होता. न्या. एम. एस. संकलेचा व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने बुधवारी त्याचा वरीलप्रमाणे निकाल दिला. ठक्कर यांच्या डोळ््याची दृष्टी अधू झाली होती व त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. प्राप्तिकर कायदा कलम ३७ : पूर्णपणे व फक्त धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी केलेला खर्च व्यवसायातील नफा मानून एकूण उत्पन्नाच्या हिशेबात वजावटीस पात्र मानला जाईल. मात्र, असा खर्च व्यक्तिगत किंवा भांडवली स्वरूपाचा असता कामा नये.डोळ््यांच्या उपचारांवरील खर्च हा निव्वळ आणि फक्त व्यवसायासाठी केलेला खर्च होत नाही. कोणीही माणूस व्यवसाय करत नसला, तरी डोळ््यांनी चांगले दिसत नसेल, तर उपचार करतोच.डोळ््यांनी नीट दिसत नसेल, तर वकील किंवा सॉलिसिटर म्हणून काम करता येत नाही, असे नाही. याच उच्च न्यायालयात अंध असूनही अनेक वकील उत्तम काम करीत आहेत. अलीकडेच दिवंगत झालेले सधन गुप्ता हे अंध होते. तरी पश्चिम बंगालमध्ये ते अ‍ॅडव्होकेट जनरल होते.हाच तर्क लावायचा झाला, तर व्यावसायिकाने स्वत:च्या खाण्यापिण्यावर केलेला खर्चही व्यावसायिक खर्चात धरावा लागेल. कारण जगलो तरच व्यवसाय करू शकेन, असे तो म्हणेल, पण हे म्हणणे पूर्णपणे अतार्किक आहे.