Join us  

नगरसेवक समजूत काढत होते, आमदार मनीषा चौधरी यांची सारवासारव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 7:16 AM

मागील आठवड्यात मंगळवारी आरोग्य विभागाच्या ‘गुरांचा कोंडवाडा’ खात्याची गाडी बोरीवलीत अडविण्यात आली. यासाठी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक जितेंद्र पटेल यांनी अक्षरश: गाडीसमोर जाऊन बराच वेळ रस्ता जाम केला. या सगळ्या प्रकरणातील तथ्य उघड करणारा आॅडिओ आणि व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. यात पालिकेची गाडी अडवून फोनवर सरकारी अधिका-यांवर दवाब निर्माण करणा-या पटेल यांचा पदार्फाश झाला आहे.

- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई  - मागील आठवड्यात मंगळवारी आरोग्य विभागाच्या ‘गुरांचा कोंडवाडा’ खात्याची गाडी बोरीवलीत अडविण्यात आली. यासाठी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक जितेंद्र पटेल यांनी अक्षरश: गाडीसमोर जाऊन बराच वेळ रस्ता जाम केला. या सगळ्या प्रकरणातील तथ्य उघड करणारा आॅडिओ आणि व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. यात पालिकेची गाडी अडवून फोनवर सरकारी अधिका-यांवर दवाब निर्माण करणा-या पटेल यांचा पदार्फाश झाला आहे. त्यामुळे नगरसेवक स्थानिकांची समजूत काढत असल्याचे सांगत, पाठराखण करणारे स्थानिक आमदार काय उत्तर देतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.गुरांचा कोंडवाडा विभागाची गाडी अडवून, त्यातून तीन गायी बेकायदेशीररीत्या बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने, ‘सरकारी कामात भाजपाचा अडथळा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. मात्र, सरकारी कामात लोकांनी अडथळा आणू नये, यासाठी स्थानिक नगरसेवक जितेंद्र पटेल लोकांची समजूत काढत होते, असे उत्तर आमदार मनीषा चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले होते.मात्र, नगरसेवकाने नेमके त्या दिवशी काय केले, याचा व्हिडीओ ‘लोकमत’ला मिळाला आहे, तसेच सरकारी अधिकाºयांसोबत पटेल यांनी कशा प्रकारे अरेरावी केली, त्याचाही खुलासा करणारी एक ‘आॅडिओ क्लिप’ हाती लागली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले ते जनतेसमोर येण्यास मदत होईल.आरोग्य खात्याच्या गुरांचा कोंडवाडा विभागाची बोरीवलीत गाडी अडवत बळजबरीने गायींना खाली काढण्यात आले. त्यापूर्वी भाजपाचे नगरसेवक जितेंद्र पटेल यांनी गायींना सोडण्यासाठी कोंडवाडा विभागाच्या दिलीप करंजकर यांच्यावर, फोनवरून कशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला, याचा आॅडिओ ‘लोकमत’ला मिळाला. त्या संभाषणाचाकाही अंश....गाडीत जनावरे चढविल्यानंतर आम्ही सोडू शकत नाही, असे मी फोनवर सांगितले. तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असे त्यांनी मला सांगितले. या प्रकरणी आम्ही परवाच अहवाल आमच्या वरिष्ठांना पाठविला आहे.- दिलीप करंजकर, अधिकारी,गुरांचा कोंडवाडा विभागनगरसेवक : सर नमस्ते, जितेंद्र पटेल बोलतो नगरसेवक.करंजकर : काय नाव?नगरसेवक : जितेंद्र पटेल (मोठ्या आवाजात)करंजकर : हा, बोला बोला...नगरसेवक : सर ये क्या है, पब्लिक इतना जमा हो गया है यहा पे, पुरा आंदोलन... ट्रक के आगे बैठ गये सब लोग, आप को छोडना ही पडेगा (जनावरांना), आप को छोडना ही पडेगा.करंजकर : एक बार (जनावरांना) अंदर डाला ना तो हम लोग छोड नही सकते, सर. आप हमारे सीनियर से बात करो.नगरसेवक : किस से बात करना होगा?करंजकर : डॉ. शेट्टे से बात करो, मैं आपको नंबर भेजता हूं.नगरसेवक : ए, ये छोड नही सकता है बोलता है (जमावाच्या दिशेने पाहून), अपुन अपने हिसाब से करते है.

टॅग्स :मुंबई