Join us

फटाके फोडत नगरसेवकाने साजरा केला वाढदिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST

४० जणांवर साकिनाक्यात गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तिसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत असताना मुख्यमंत्री उध्दव ...

४० जणांवर साकिनाक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तिसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्यातील लोकांना केले आहे. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवत ४० कार्यकर्त्यांना गोळा करून फटाके फोडत आणि लाऊडस्पीकर लावत शिवसेनेच्या नगरसेवकाने शुक्रवारी वाढदिवस साजरा केला. त्यानुसार साकीनाका पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

वॉर्ड क्रमांक १६० मधील हा नगरसेवक असून किरण लांडगे असे त्याचे नाव आहे. लांडगे यांच्या अंधेरी-घाटकोपर लिंक रोड येथील कार्यालयात ३० ते ४० कार्यकर्ते शुक्रवारी जमा झाले आणि त्यांनी लांडगे यांचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी हा जल्लोष करण्यासाठी एलईडी स्क्रीन आणि लाऊडस्पीकरदेखील लावण्यात आला होता. फटाके फोडत त्यांनी केकही कापल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.