coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:00 PM2020-07-30T12:00:14+5:302020-07-30T12:06:55+5:30

कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे

coronavirus: Will the state government allow the servants to go to Konkan for Ganeshotsav or not? BJP's angry question | coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल

coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांनी पुन्हा एकदा घेतली आक्रमक भूमिका राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांची ताटातूट केली त्याचप्रमाणे कोकणवासीयांचीही राज्य सरकार ताटातूट करणार का?

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक ३ साठीची केंद्र आणि राज्य सरकारची नियमावली प्रसिद्ध झाली आहे. राज्यात  आता केवळ कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे, दरम्यान, गणेशोत्सवासाठीकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? असा सवाल ट्विट करून सरकारला विचारला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात की, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देणार की नाही? लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांची ताटातूट केली त्याचप्रमाणे कोकणवासीयांचीही राज्य सरकार ताटातूट करणार? सरकार कधी निर्णय घोषित  करणार? ई-पास कधी पासून उपलब्ध होणार? क्वारेंटाईन करणार कि अँटीबॉडी टेस्ट करणार?

दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेसुद्धा गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यात तयार असल्याचा दावाही शेलार यांनी केला आहे.  ते म्हणाले की,  रेल्वेमंत्री  पीयुष गोयल  यांच्याशी आम्ही चर्चा केल्याप्रमाणे ते गणेशोत्सवासाठी  चाकरमान्यांना विशेष रेल्वे  गाड्या उपलब्ध  करून  देण्यास तयार आहेत.  मात्र राज्य सरकारने अद्याप मागणी का केलेली नाही?  राज्य सरकार  सगळ्याच बाजूने  कोकणी माणसाची कोंडी  का  करतेय? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

Web Title: coronavirus: Will the state government allow the servants to go to Konkan for Ganeshotsav or not? BJP's angry question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.