जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:43 AM2021-05-09T03:43:00+5:302021-05-09T03:43:56+5:30

लहान मुलांच्या विलगीकरणासाठी मसुदा तयार करण्यात येत आहे. बाधित मुलांसाठी स्वतंत्र नियमावली अस्तित्वात नाही. त्यामुळे संसर्ग झालेल्या मुलांना जम्बो केंद्रात वेगळे ठेवण्यात येत आहे. मात्र आता नवी नियमावली बनविण्यात येत आहे.

CoronaVirus Separate rooms for children in jumbo covid centers, municipal corporation preparations against the backdrop of the third wave | जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी

जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी

Next

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेऊन बालरोगतज्ज्ञांचा कृतीगट स्थापन केला आहे. तर, पालिकेने नऊ वर्षांपर्यंतच्या आणि १० ते १९ वर्षांच्या मुलांसाठी स्वतंत्र नियमावली, आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लवकरच मुंबईत उभारण्यात येणाऱ्या जम्बो केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. (CoronaVirus Separate rooms for children in jumbo covid centers, municipal corporation preparations against the backdrop of the third  wave)

लहान मुलांच्या विलगीकरणासाठी मसुदा तयार करण्यात येत आहे. बाधित मुलांसाठी स्वतंत्र नियमावली अस्तित्वात नाही. त्यामुळे संसर्ग झालेल्या मुलांना जम्बो केंद्रात वेगळे ठेवण्यात येत आहे. मात्र आता नवी नियमावली बनविण्यात येत आहे.

शक्यतो नऊ वर्षांच्या आतील कोरोनाबाधितांना क्वारंटाइन करणे अवघड हाेते. त्यामुळे क्वारंटाइनच्या नव्या नियमावलीत लहान मुलांचा विचार करण्यात येत आहे. १० ते १९ वर्षांच्या बाधितांसाठी नव्या जम्बो केंद्रांत स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल.  उपचारासाठी बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती हाेईल. लहान मुलांची उपचार पद्धतीही निश्चित करण्याचे काम सुरू आहे. 

दरम्यान, आतापर्यंत नऊ वर्षांच्या आतील ११,१४४ मुले काेराेनाबाधित झाली. यापैकी १७ मुलांचा मृत्यू झाला. तर, १० ते १९ वयोगटातील २८, ८६९ बाधित मुलांपैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: CoronaVirus Separate rooms for children in jumbo covid centers, municipal corporation preparations against the backdrop of the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.