coronavirus: अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना फोन, लोकमतच्या वृत्ताची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:18 AM2020-07-10T02:18:25+5:302020-07-10T02:18:56+5:30

मुंबई विभागात विश्रांतीगृहात एकत्र राहिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वांना झाला. तर, काही साता-याहून मुंबईत आलेले कर्मचारी कोरोनाबाधित होते.

coronavirus: Senior officials finally call ST coroned employees, take notice of referendum | coronavirus: अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना फोन, लोकमतच्या वृत्ताची घेतली दखल

coronavirus: अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना फोन, लोकमतच्या वृत्ताची घेतली दखल

googlenewsNext

- कुलदीप घायवट
मुंबई : कोरोनाबाधित एसटी कर्मचाºयांची वरिष्ठ अधिकाºयांकडून विचारपूस केली जात नव्हती. कर्मचाºयांचे मानसिक खच्चीकरण होत होते. ‘लोकमत’ने यासंबंधीचे वृत्त गुरुवारी प्रकाशित केले. त्या दिवशीच वरिष्ठ अधिकाºयांनी कोरोनाबाधित कर्मचाºयांना फोन करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. फोन आल्याने मानसिक बळ मिळाले आहे, असे मत कर्मचाºयांनी व्यक्त केले.
मुंबई विभागात विश्रांतीगृहात एकत्र राहिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वांना झाला. तर, काही साताºयाहून मुंबईत आलेले कर्मचारी कोरोनाबाधित होते. त्यामुळे सर्व जण रुग्णालयात, विलगीकरण कक्षात दाखल झाले. मात्र त्यांची वरिष्ठ अधिकाºयांकडून कोणतीही विचारपूस केली गेली नाही. औषध व इतर बाबींसाठी आर्थिक मदत केली जात नसल्याची व्यथा एसटी कर्मचाºयांनी मांडली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना एसटी महामंडळाने राज्यभरातील विभागांना पत्राद्वारे दिल्या. आगारपातळीवर या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले. एसटी कर्मचाºयांचे मनोबल कमी होत होते. त्यांना मानसिक आधाराची, आपुलकीची आवश्यकता होती. ‘लोकमत’ने वृत्ताची दखल घेत अधिकाºयांनी बाधित कर्मचाºयांची विचारपूस केली.
मागील आठ दिवसांपासून रुग्णालयात दाखल झालो आहे. मात्र कोणत्याही अधिकाºयांनी विचारपूस करण्यासाठी फोन केला नाही. आर्थिक मदत देण्याबाबत लांबची गोष्ट आहे. गुरुवारी वरिष्ठ अधिकाºयांनी फोन करून तब्येतीची चौकशी केली. फोन केल्याने मानसिक आधार मिळाला आहे. परंतु, पगाराचा विषय काढताच फोन बंद करण्यात आला. पगार लवकर व्हावा, अशी प्रतिक्रिया कोरोनाबाधित एसटी चालकाने दिली.

जनजागृती आणि उपाययोजनांवर भर

प्रत्येक कोरोनाबाधित कर्मचाºयाची माहिती एसटी महामंडळाकडे आहे. जिल्हापातळीवर कोरोना विशेष टीम तयार केली आहे. त्याद्वारे प्रत्येकाची चौकशी केली जाते. कोरोनाबाधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयाची विचारपूस केली जात आहे. कर्मचाºयांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी खूप काळजी घेतली जात आहे.

एसटी सुरूझाल्यापासून कर्मचाºयांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. मात्र अचानक कोरोनाचा प्रसार वाढला. आता कोरोनाबाधित कर्मचाºयांची संख्या कमी होत आहे. जनजागृती आणि उपाययोजना यावर भर दिला जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

Web Title: coronavirus: Senior officials finally call ST coroned employees, take notice of referendum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.