coronavirus: पोद्दार रुग्णालयात रोबोट गोलर कार्यरत, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची जोखीम टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 02:09 AM2020-07-09T02:09:41+5:302020-07-09T02:09:48+5:30

मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे. पालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत आहे.

coronavirus: Robot Golar working in Poddar Hospital, avoiding the risk of medical staff | coronavirus: पोद्दार रुग्णालयात रोबोट गोलर कार्यरत, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची जोखीम टळणार

coronavirus: पोद्दार रुग्णालयात रोबोट गोलर कार्यरत, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची जोखीम टळणार

Next

मुंबई : वरळीच्या पोद्दार रुग्णालयात रोबोट ‘गोलर’ आॅन ड्युटी दाखल झाला आहे. अन्न, पाणी आणि औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘गोलर’ करत आहे. कोरोनाच्या संघर्ष काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबतचा संपर्क कमी होणार आहे. जोखीम कमी होणार आहे.

मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे. पालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत आहे. लढाईमधील कोविड योद्धे सुरक्षित ठेवण्यासाठी गोलर (ॠङ्म’’ं१) हा रोबोट दाखल झाला आहे, नुकतीच त्याची सेवा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंगळवारी रोबोट गोलरच्या सेवेचा पहिला व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. रोबोट ‘गोलर’ पोद्दार रुग्णालयात ड्युटीवर दाखल झाला आहे. अन्न, पाणी व औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘गोलर’ करत आहे. ‘वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबतचा संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे,’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या रोबोटमुळे कर्मचाºयांना पीपीई कीट घालून करावी लागणारी रुग्णसेवा, त्यावरचा ताण कमी होणार आहे. हा रोबोट गोलर कोविड फ्रंटलाइन वर्कर्सनी बनवला असल्याची माहिती वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

याविषयी पोद्दार रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रज्ञा कापसे यांनी सांगितले, या रोबोटचा फायदा नक्कीच होतो आहे. रुग्णांना ज्या गोष्टी द्याव्या लागतात, जसे की डिस्पेंसरीसाठी खूप मोठी मदत होत आहे. डॉक्टरांचा होणारा जो धोका आहे तो कमी होणार आहे. औषधे, नाश्ता, जेवण, पाणी हे सर्व देण्यासाठी या रोबोटचा फायदा नक्कीच होतो आहे. डॉक्टरांचा जो रुग्णांशी होणारा संपर्क आहे तो कमी होणार आहे.

Web Title: coronavirus: Robot Golar working in Poddar Hospital, avoiding the risk of medical staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.