Coronavirus : व्हायरल होणारे ‘ते’ औषध सामान्यांसाठी नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 03:02 AM2020-03-24T03:02:17+5:302020-03-24T03:02:28+5:30

सध्या जगात सगळीकडे पसरणारा कोरोना हा विषाणू देशात व राज्यात गतीने पसरत आहे.

Coronavirus: Not for viral 'that' drug to common people | Coronavirus : व्हायरल होणारे ‘ते’ औषध सामान्यांसाठी नव्हे!

Coronavirus : व्हायरल होणारे ‘ते’ औषध सामान्यांसाठी नव्हे!

googlenewsNext

- स्नेहा मोरे

मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लक्षणे नसतानाही सुदृढ व्यक्तींनी हे औषध घ्यावे असा संदेश सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, मागील काही दिवसांत ‘त्या’ औषधांच्या गोळ्यांचा खपही वाढला आहे. मात्र सोमवारी इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने सोमवारी हे औषध सर्वसामान्यांनी घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सध्या जगात सगळीकडे पसरणारा कोरोना हा विषाणू देशात व राज्यात गतीने पसरत आहे. कोरोना विषाणूविषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविण्यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर केला जात असल्याचे लक्षात आल्याने राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महाराष्ट्र सायबर कार्यालयाने कोरोनाविषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
याविषयी, डॉ. राहुल
सोनावणे यांनी सांगितले, सामान्य नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कोणतीही लक्षणे नसताना औषधे, गोळ्या घेऊ नयेत. कोरोनाविषयी प्रशासनास सहकार्य करुन ती मार्गदर्शन कटाक्षाने पाळावीत मात्र स्वत:हून कोणतीही औषधे घेऊ नयेत. सामान्यांनी कुठेही बाहेर फिरु नये, घरात राहून सुरक्षित रहावे आणि स्वच्छता पाळावी.

इथे करा तक्रार

सर्व टिव्ही चॅनेल्स, सर्व वृत्तपत्रे यांनी कोरोना विषाणूसंदभार्तील कोणतीही बातमी खातरजमा करुनच प्रसारीत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवा पसरविणा?्या लोकांच्या तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये किंवा ६६६.ू८ुी१ू१्रेी.ॅङ्म५.्रल्ल यावर नोंद कराव्यात.

Web Title: Coronavirus: Not for viral 'that' drug to common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.