CoronaVirus News :केईएममधल्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर शिवसेनेचं स्पष्टीकरण; अनिल देसाई म्हणतात... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:37 PM2020-05-11T14:37:31+5:302020-05-11T14:46:21+5:30

अशा व्हायरल व्हिडीओबाबत केईएम रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले  नाही.

CoronaVirus News : Shiv Sena's explanation on 'that' viral video in KEM vrd | CoronaVirus News :केईएममधल्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर शिवसेनेचं स्पष्टीकरण; अनिल देसाई म्हणतात... 

CoronaVirus News :केईएममधल्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर शिवसेनेचं स्पष्टीकरण; अनिल देसाई म्हणतात... 

googlenewsNext

मुंबई भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील मुंबई शहरातील केईएम हॉस्पिटलचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, ज्या वॉर्डमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तेथे मृतदेह देखील पडून आहेत. अशा व्हायरल व्हिडीओबाबत केईएम रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले  नाही. मात्र, या प्रकरणी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

शिवसेना खासदार अनिल देसाई या प्रकरणात म्हणाले, जास्तीत जास्त काळजी घेतली जात आहे. असा एखादा व्हिडिओ (केईएम हॉस्पिटल) सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्यास कदाचित त्याच क्षणी तो प्रकार घडला असावा, पण लगेच त्यात सुधारणा करण्यात आली असून, उपाययोजना केली गेली आहे. सर्व अधिकारी कार्यक्षमतेने काम करीत आहेत. कोणालाही बदनाम करण्याची गरज नसल्याचंही अनिल देसाई यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे.

 
तत्पूर्वी हा व्हिडीओ ट्विट करत नितेश राणे यांनी लिहिले होते की, 'केईएम हॉस्पिटल सकाळी ७ वाजता! मला वाटतं की, मुंबई बीएमसीची आम्हाला आपल्या आजूबाजूच्या मृतदेहांना उपचारांच्या वेळी पाहण्याची सवय लागावी, अशी इच्छा आहे. कारण त्यांना आता सुधारण्यात रस नाही! अशा परिस्थितीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचंही वाईट वाटते, काही आशा आहे का?, असं ट्विट करत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात कोरोना संक्रमिताच्या संख्येत 1,278 रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या 22,171 पर्यंत गेली आहे, तर मृतांचा आकडा 832वर पोहोचला आहे. राज्यात कोरोनामध्ये सर्वाधिक 13,739 आणि पुणे महानगरपालिकेत 2377 रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 4,199 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्याचवेळी, कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशात वेगाने वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सकाळी सांगितले की, आता भारतात कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 67,152 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची आणखी 4,213 प्रकरणे समोर आली आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Lockdown : पोस्टाच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; दर महिन्याला होणार जबरदस्त कमाई

CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली

Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"

"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"

Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!

Web Title: CoronaVirus News : Shiv Sena's explanation on 'that' viral video in KEM vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.