CoronaVirus News: धोका वाढला! राज्यातील रुग्णसंख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 04:51 AM2020-06-27T04:51:40+5:302020-06-27T04:52:18+5:30

तर राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के इतका आहे. राज्यात नोंद झालेल्या १७५ मृत्यूंपैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत.

CoronaVirus News: The number of patients in the state has crossed the 1.5 lakh mark | CoronaVirus News: धोका वाढला! राज्यातील रुग्णसंख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यातील रुग्णसंख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा

Next

मुंबई : राज्यात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिल्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर आज (शुक्रवारी) दिवसभरात तब्बल ५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १७५ मृत्यू झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ७६५ झाली असून बळींचा आकडा ७ हजार १०६ इतका झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के झाले असून सध्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के इतका आहे. राज्यात नोंद झालेल्या १७५ मृत्यूंपैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित ८४ हे मागील काळातील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ७३, नाशिक ३, ठाणे २, उल्हासनगर १, मीरा-भार्इंदार १, पुणे १, पिंपरी-चिंचवड १, नंदुरबार १ आणि औरंगाबाद १ यांचा समावेश आहे. मुंबईत १ हजार २९७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून बाधितांची संख्या ७२ हजार १७५ झाली आहे. तर दिवसभरात ४४ मृत्यू झाले असून एकूण बळी ४ हजार १७९ झाले आहेत. शहर, उपनगरात २८ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात २ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ७९,८१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
>मुंबईनंतर ठाणे, पुणे आघाडीवर
राज्यात मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मुंबईत रुग्णांनी ७२ हजारांचा टप्पा गाठला आहे. मुंबई नंतर ठाण्यात ३०,८७१ रुग्ण, पुण्यात १९,०३१ रुग्ण, तर औंरगाबादमध्ये ४,३५४ कोरोना रुग्ण आहेत. अन्य राज्य व देशातील १२३ कोरोना रुग्ण राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

Web Title: CoronaVirus News: The number of patients in the state has crossed the 1.5 lakh mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.