Join us  

CoronaVirus News: संकट काळात मदत करणारा महापालिकेचा अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:56 AM

एसओएस सुविधा सुरू : मित्र, नातेवाइकांना पोहोचणार सूचना

मुंबई : संकटकाळात मदतीसाठी आपण देवाचा धावा करतो. मात्र आता महापालिकेच्या अ‍ॅपवर क्लिक केल्यास आपत्कालीन नियंत्रण कक्षासह जवळचे मित्र, नातेवाईकांना आपल्या लोकेशनची माहिती पोहचणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ मदत मिळू शकणार आहे. यासाठी ‘डिजास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ अ‍ॅपवर ‘एसओएस’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यावर सुरेक्षेसाठी महत्त्वाच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.मुंबईत मान्सूनला सुरुवात झाली आहे. आपत्ती काळात मुंबईकरांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी पालिकेने आपत्कालीन यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवली आहे. तसेच पावसाळी, भौगोलिक परिस्थितीची माहिती, आणिबाणी प्रसंगी संपर्क कुठे साधावा याबाबतची महिती देणारा मोबाईल अ‍ॅपही विकसित करण्यात आला आहे. यासाठी ‘डिजास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावा लागेल. अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रकारच्या प्रणालींकरिता ही सुविधा उपलब्ध आहे. अशी आहे अ‍ॅपवरील सुविधामहत्त्वाच्या ठिकाणी पडलेल्या पावसाचे प्रमाण, भरती-ओहोटी-लाटांची उंची, पर्यायी वाहतूक व्यवस्था लोकल-विमान वाहतुकीची स्थिती याची माहिती मिळते.‘सेफ्टी टिप्स’ या सुविधेअंतर्गत २० वेगवेगळ्या आपत्तीप्रसंगी  काय करावे आणि काय करू नये याची माहिती देणाऱ्या २० अ‍ॅनिमेटे फिल्म दिसतात.या अ‍ॅपवरील ‘एसओएस’ (सेव्ह अवर सोल) या वैशिष्ट्यपूर्ण सुविधेवर आपले जवळचे नातेवाईक, मित्र यांचे मोबाईल क्रमांक सेव्ह करता येतात. त्यामुळे संकटसमयी मदतीसाठी या सुविधेवर क्लिक केल्यानंतर आपण सेव्ह केलेल्या संबंधित मोबाईल क्रमांकावर आपण असलेल्या ठिकाणाचा पत्ता पोहोचतो. अ‍ॅपवर ‘इमर्जन्सी’ या बटनावर क्लिक केल्यास संबंधित ठिकाणच्या ५०० मीटर परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्रे, पोलीस ठाणे, पालिका विभाग, नियंत्रण कक्षाचे संपर्क दिसतील.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका