Join us  

CoronaVirus News : कोरोनासह जगण्यासाठी स्वत:मध्ये बदल करा- डॉ. जलील पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:28 AM

मात्र तसे करताना कुठेही माणुसकीला धक्का बसणार नाही याचे भान बाळगावे, असे आवाहन प्रसिद्ध श्वसनविकारजज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी केले आहे.

स्नेहा मोरे मुंबई : कोरोनाच्या संकटाचे वादळ होईल अशी कल्पना नव्हती. आता सर्वत्र नियम शिथिल करण्यात येत आहेत, पण लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसून आले नाही. आता मात्र आपण कोरोनासह जगायला शिकले पाहिजे, ही परिस्थिती स्विकारुन त्याप्रमाणे स्वत: बदल केला पाहिजे. मात्र तसे करताना कुठेही माणुसकीला धक्का बसणार नाही याचे भान बाळगावे, असे आवाहन प्रसिद्ध श्वसनविकारजज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी केले आहे.दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर म्हणून सर्वांना परिचीत असणाऱ्या ६२ वर्षीय डॉ. जलील पारकर यांनाही उपचार करताना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन नुकतेच ते घरी परतले आहेत. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, की कोरोनाचे संकट वादळात रुपांतर होईल अशी कल्पनाही नव्हती. ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक धोका आहे, असे असतानाही डॉक्टर म्हणून स्वस्थ बसून राहणे शक्यच नव्हते. त्यामुळे अविरतपणे कोरोना रुग्णांच्या सेवेचे व्रत स्वीकारले आणि अचानक एक दिवस या वादळाने मलाच मिठी मारली, त्यावेळी न डगमगता अतिदक्षता विभागात उपचार घेऊन कोरोनावर मात केली, पुन्हा लवकरच रुग्णसेवेत रुजू व्हायचे आहे.कोरोना रुग्णांवर उपचारकरण्यापासूसन ते स्वत:रुग्ण असतानाकेलेल्या संघर्षाबद्दल कायसांगाल?कोरोनाचा प्रवेश मुंबईत झाला, त्यावेळी अचानक हे संकट इतके मोठे होईल याची कल्पना नव्हती. जवळपास २००हून अनेक रुग्णांवर या काळात उपचार केले, पण ११ जूनला अचानक माझी तब्येत बिघडली. दोन दिवस उलटल्यानंतरही आराम नव्हता. त्यानंतर १३ जूनला तब्येत खूपच बिघडली आणि थेट अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. दुसºयाच दिवशी माझ्या शेजारच्या खाटेवर पत्नीलाही दाखल करण्यात आले. आम्ही दोघही कोरोनावर उपचार घेत होतो. माझ्यामुळे तिला या भयाण परिस्थितीतून जावे लागत आहे, अशी अपराधात्मक भावना सतत सतावत होती. यावर मुलाला काय उत्तर देऊ ? हा विचार सतावत होता. पण मग हिंमत एकवटून लढायचे ठरवले, अन् पुढच्या काही दिवसांत दोघांनीही कोरोनावर मात केली.खासगी रुग्णालयातीलउपचारांविषयी सामान्यांमध्येगैरसमज आहेत का?खासगी रुग्णालयातही शासकीय रुग्णालयांप्रमाणेच अविरतपणे डॉक्टरांपासून अगदी परिचारिका, सफाई कामगार राबत आहेत. मात्र त्याविषयी कधीच बोलले जात नाही. प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठीही खासगी रुग्णालयातील डॉक्टरही आटापिटा करत आहेत.मी अतिदक्षता विभागातअसताना रुग्णलायातील डॉक्टरांच्या चमूने मला पुनर्जन्म दिला आहे.डॉ. संजय पांडे, डॉ. शशांक जोशी,डॉ. प्रल्हाद प्रभूदेसाई, डॉ. नितीन गोखले, डॉ.पंकज पटेल, डॉ.नीतिन डांगे, डॉ. दत्ताप्रसन्न कुलकर्णी, डॉ. अनुप रमानी यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले.>कोविड योद्धा ते कोरोना रुग्ण याविषयीचा अनुभव कसा होता?प्रसिद्ध डॉक्टर असूनही या काळात सोसायटीमधील लोकांकडून भेदभाव करण्यात आला. कोरोना रुग्णांची सेवा देणारे किंवा कोरोना रुग्ण असणारे कुटुंबीय हे अस्पृश्य असतात, या वागणुकीचा जवळून अनुभव घेतला.