अ‍ॅबॉट भारतात करणार अँटिबॉडी चाचण्यांच्या १० लाखांहून अधिक किट्सचा पुरवठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 02:57 PM2020-06-25T14:57:56+5:302020-06-25T15:00:35+5:30

अँटिबॉडी किटच्या चाचण्यांचे निष्कर्ष ९९.६ टक्के अचूक

coronavirus news Abbott to supply more than 10 lakh antibody test kits in India | अ‍ॅबॉट भारतात करणार अँटिबॉडी चाचण्यांच्या १० लाखांहून अधिक किट्सचा पुरवठा 

अ‍ॅबॉट भारतात करणार अँटिबॉडी चाचण्यांच्या १० लाखांहून अधिक किट्सचा पुरवठा 

Next

मुंबई: एखाद्या व्यक्तीला कोरोनाविषाणूचा (कोविड-१९) संसर्ग होऊन गेला होता का, हे निश्चित करणाऱ्या आयजी-जी अँटिबॉडीच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आधारित रक्त चाचणी साहित्याचा पुरवठा सुरू केल्याचे अ‍ॅबॉटने आज जाहीर केले. या चाचणीची १० लाख किट्स भारतात पुरवण्याची अ‍ॅबॉटची क्षमता असून महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर व गुजरातमधील अनेक आघाडीच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांना अँटिबॉडी चाचण्यांच्या किट्स पुरवण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.

"आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी चाचण्यांच्या माध्यमातून कोविड-१९ अँटिबॉडी तपासण्याच्या आयसीएमआरच्या धोरणाला हातभार लावता येणे ही अ‍ॅबॉटसाठी आनंदाची बाब आहे. अ‍ॅबॉटने नुकतेच बाजारात आणलेले सार्स-सीओव्ही-२ आयजी-जी चाचणी किट आरोग्यसेवा कर्मचारी, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, फ्रंटलाइन कर्मचारी किंवा कोरोना प्रभावित क्षेत्रातील जनता यांसारख्या धोक्यातील लोकसंख्येमधील संक्रमणाचा प्रसार समजून घेण्यासाठी वापरले जाऊ शकते. या चाचण्या सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्षणविरहित रुग्णांमधील प्रसाराविषयी मौल्यवान माहिती देतात. आपल्या सार्वजनिक आरोग्य उपायांच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यात मदत करतात आणि एकंदर कोविड-१९ परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे, यावर मार्गदर्शन करतात,” असे अ‍ॅबॉटच्या भारतातील डायग्नोस्टिक्स व्यवसायाचे महाव्यवस्थापक व कंट्री हेड नरेंद्र वर्दे यांनी सांगितले.

भारतात या चाचणीचे मूल्यमापन करणाऱ्या पहिल्या काही रुग्णालयांमध्ये मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचा समावेश होतो. मुंबईतील हिंदुजा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या प्रयोगशाळा संशोधन विभागाच्या संचालक तसेच चीफ ऑफ लॅब्ज (प्रशासन) डॉ. टेस्टर एफ. आशा वैद म्हणाल्या, “कोविड-१९साठी आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी आम्ही केलेल्या या चाचण्यांचे प्रारंभिक निदान अचूक ठरले आहे. ही चाचणी क्लिनिशियन्स व समुदायांसाठी उपयुक्त आहे.”

अ‍ॅबॉटची सार्स-सीओव्ही-२ आयजी-जी चाचणी विशेषत्वाने आयजी-जी अँटिबॉडींचे निदान करते. आयजी-जी हे एक प्रथिन असून, संसर्गाच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये शरीर हे प्रथिन तयार करते. रुग्ण कोविड-१९ आजारातून बरा झाल्यानंतर काही महिने किंवा अगदी वर्षापर्यंतही हे प्रथिन त्याच्या शरीरात राहू शकते. ही चाचणी ARCHITECT® i1000SR आणि i2000SR या प्रयोगशाळा उपकरणांवर करण्यात आली. ही उपकरणे भारतभरातील रुग्णालये व प्रयोगशाळांमध्ये बसवण्यात आली असून, त्यावर तासाभरात १००-२०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. त्यामुळे साथीच्या काळात अँटिबॉडी चाचण्या खात्रीशीर मार्गाने होऊ शकतात. लक्षणे दिसून लागल्यानंतर १७ दिवसांनी किंवा त्याहून अधिक काळाने ही चाचणी केलेल्या रुग्णांमध्ये या चाचण्यांचे निष्कर्ष ९९.९ टक्के अचूक व १०० टक्के संवेदनशीलतेसह आले, असा स्वतंत्र संशोधकांचा निष्कर्ष आहे.

Web Title: coronavirus news Abbott to supply more than 10 lakh antibody test kits in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.