CoronaVirus News: कोरोनाचे संकट गडद; मुंबईत 24 तासांत 11,163 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:32 AM2021-04-05T03:32:45+5:302021-04-05T06:52:51+5:30

दैनंदिन रुग्णसंख्येचा नवा विक्रम; राज्यात ५७ हजार ७४ नवे बाधित

CoronaVirus News 11163 new corona cases reported in Mumbai in 24 hours | CoronaVirus News: कोरोनाचे संकट गडद; मुंबईत 24 तासांत 11,163 रुग्ण

CoronaVirus News: कोरोनाचे संकट गडद; मुंबईत 24 तासांत 11,163 रुग्ण

Next

मुंबई : मुंबई दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहर, उपनगरात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने नवा विक्रम रचला असून, गेल्या २४ तासांत तब्बल ११ हजार १६३ रुग्ण आणि २५ मृत्यूंची नोंद झाली. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ५२ हजार ४४५ वर पोहोचली असून एकूण मृतांचा आकडा ११ हजार ७७६ झाला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये काेराेना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईत पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांनी ११ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या शहर, उपनगरात उपचाराधीन रुग्णांची संख्या ६८ हजार ५२ आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर, राज्यात २४ तासांत तब्बल ५७ हजार ७४ नव्या बाधितांचे निदान झाले.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्के असून २८ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.६१ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४२ दिवसांवर आहे. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या ७४ आहे, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ७०० आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३० हजार १३९ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. मुंबईत रविवारी ४३ हजार ५९७ कोरोना चाचण्या केल्या असून आतापर्यंत एकूण ४२ लाख ६९ हजार १७५ कोरोना चाचण्या केल्या आहेत.

मुंबईत असा वाढला दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख
४ एप्रिल ११,१६३
३ एप्रिल ९०९०
२ एप्रिल ८८३२
१ एप्रिल ८६४६
३१ मार्च ५३९४

राज्यात दिवसभरात २२२ मृत्यू
मुंबई : मागील २४ तासांत राज्यात ५७ हजार ७४ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २२२ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात २०२० साली कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात दैनंदिन कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. 

आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३० लाख १० हजार ५९७ झाली असून बळींचा आकडा ५५ हजार ८७८ झाला आहे. सध्या ४ लाख ३० हजार ५०३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर १.८६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५ लाख ४० हजार १११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.६६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ५ हजार ८९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १९ हजार ७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

उपचाराधीन रुग्णांची आकडेवारी
पुणे ८१,३१७, मुंबई ६६,८०३, नागपूर ५३,६३८, 
ठाणे ५३,२३०, नाशिक ३१,७३७

राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चिंताजनक
४ एप्रिल ५७,०७४
३ एप्रिल ४९,४४७
२ एप्रिल ४८,८२७
१ एप्रिल ४३,१८३
३१ मार्च ३९,५५४
३० मार्च २७,९१८

सर्वांत कमी उपचाराधीन रुग्ण असलेले जिल्हे
गडचिरोली ४८२
सिंधुदुर्ग ६५४
रत्नागिरी ८१९

Web Title: CoronaVirus News 11163 new corona cases reported in Mumbai in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.