Coronavirus : राज्यात २५ लाख तीनपदरी मास्कची गरज; डॉक्टरांसाठी लागतील ९६ हजार सुरक्षित पोशाख

By अतुल कुलकर्णी | Published: March 24, 2020 02:47 AM2020-03-24T02:47:32+5:302020-03-24T05:56:02+5:30

Coronavirus : परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपली कितपत तयारी आहे असे विचारले असता डॉ. लहाने म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांचे पूर्णपणे विलगीकरण करावे लागले.

Coronavirus: Needs 25 lakh three-legged masks in the state; 96 thousand safe clothing for doctors | Coronavirus : राज्यात २५ लाख तीनपदरी मास्कची गरज; डॉक्टरांसाठी लागतील ९६ हजार सुरक्षित पोशाख

Coronavirus : राज्यात २५ लाख तीनपदरी मास्कची गरज; डॉक्टरांसाठी लागतील ९६ हजार सुरक्षित पोशाख

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांसाठी उपचार करण्याकरिता डॉक्टरांना पुर्णांशाने संरक्षण देणारे पोशाख अर्थात पीपी किट घालावे लागतात. सध्याच्या आपतकालिन स्थितीत राज्यात असे ९६,७२० पोशाख आणि तब्बल २५ लाख तीन पदरी (ट्रिपल लेअर) मास्कची गरज लागणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी लोकमतला दिली.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपली कितपत तयारी आहे असे विचारले असता डॉ. लहाने
म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांचे पूर्णपणे विलगीकरण करावे लागले. व्हेंटिलेटर,
आयसीयू लागतील. या रुग्णांना अन्य सामान्य रुग्णांसोबत ठेवताही येत नाही, अशावेळी सगळी वेगळी
यंत्रणा उभी करावी लागेल. आपण सगळी तयारी केली आहे.
आज सरकारच्या १८ मेडिकल कॉलेजमध्ये ४०२ आणि खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ५७५ असे
९७७ ‘आयसोलेशन बेड’ तयार आहेत. त्याशिवाय राज्यातील अनेक खासगी व ट्रस्टचे हॉस्पिटल यांनी देखील त्यांच्याकडे व्यवस्था केली आहे. त्याशिवाय पुणे व मुंबईत प्रत्येकी ७०० असे १४००, जी. टी. आणि सेंट जॉर्ज मिळून ६०० तर जळगाव, बारामती वगळून प्रत्येक मेडिकल कॉलेजात ७० ते १०० बेड असे १४ कॉलेजांमध्ये १२०० ‘आयसोलेशन बेड’ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुण्यात ५०, मुंबईत ७० आयसीयूचे बेड तयार केले आहेत, असेही ते म्हणाले.

राज्यात १०९८ व्हेंटिलेटर्स
सध्या राज्यातील १८ सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ५४० तर २८ खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये ५५८ व्हेंटिलेटर्स आहेत. त्यापैकी ९८ व्हेंटिलेटर्स कोरोना बाधित रुग्णांसाठी राखून ठेवले आहेत. आणखी १०० व्हेंटिलेटर्सची मागणी गेली असून ते देखील लवकरच येतील.

तपासणी केंद्रे वाढवली
- सध्या राज्यात कस्तुरबा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, नागपूर आणि पुण्यात एनआईए येथे कोरोनाच्या तपासण्या सुरू आहेत. तेथे २४ तासांत मिळून १९०० रुग्णांच्या स्वॅबच्या तपासण्या होत आहेत. त्याशिवाय जे. जे. मेडिकल कॉलेज, हापकीन आणि बीजे मेडिकल कॉलेज अशा तीन ठिकाणी उद्यापासून तपासणी केंद्रे सुरु होतील. त्या ठिकाणी रोज प्रत्येकी २०० तपासण्या होतील.
- सहा दिवसांनी त्या ठिकाणी रोज ८०० तपासण्या होतील. तसेच २७ तारखेपर्यंत नागपूरला आणखी एक तपासणी केंद्र सुरु होईल. तेथे रोज २०० तपासण्या होतील. अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज याठिकाणी देखील रोज १०० तपासण्या होऊ शकतील, अशी तपासणी केंद्रे चार ते पाच दिवसांत कार्यान्वित होतील.

इतर साहित्यही खूप लागेल
- आपल्याकडे ‘एन ९५’ हे ८४४५ मास्क आहेत, तर तीन पदरी मास्क ४,२६,७०० आणि डॉक्टरांसाठीचे पीपी एचआयव्ही कीट १४,३६५ आहेत.
- आपण १,२६,००० ‘एन ९५’ मास्क, २५,०५,००० तीन पदरी मास्क, डॉक्टरांसाठी बंदिस्त असे ९६,७२० पीपी एचआयव्ही कीट (पोषाख), ५७,७५० अल्कोहोल बेस सॅनेटायझर, एक लाख अ‍ॅन्टीसेप्टीक बाटल्या, १०० व्हेंटिलेटर, आणि १०० मॉनिटरची मागणी नोंदवली आहे. तेही तातडीने उपल्बध होतील, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. त्यातील काहींची गरज १५ दिवसांपुरती आहे. आणखी रुग्ण वाढले तर १५ दिवसांनी हे साहित्य मागविले जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: Coronavirus: Needs 25 lakh three-legged masks in the state; 96 thousand safe clothing for doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.